Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

AAP ने राघव चड्डा यांना गटनेतेपदावरून हटवले

नवी दिल्ली : राज्यसभेतील आपचे नेते राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून दूर करून अशोक मित्तल यांची त्या पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय आम आदमी पार्टी न

युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या; प्रति बॅरल 115 डॉलरच्या वर पोहोचल्या किंमती
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 33 प्रश्‍न निश्‍चित; पहिला टप्पा 1 एप्रिलपासून; डिजिटल पद्धतीने माहिती संकलन
पेट्रोकेमिकल क्षेत्राला दिलासा; 40 उत्पादनांवरील सीमा शुल्क माफ

नवी दिल्ली : राज्यसभेतील आपचे नेते राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून दूर करून अशोक मित्तल यांची त्या पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय आम आदमी पार्टी ने घेतला आहे. पक्षाने यासंदर्भात राज्यसभा सचिवालयाला अधिकृत पत्र पाठवून बदलाची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
पक्षाच्या नव्या धोरणानुसार, सभागृहातील कामकाज अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि पक्षाची भूमिका ठळकपणे मांडण्यासाठी अशोक मित्तल यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून पक्षाची संसदीय रणनीती अधिक सक्षम होईल, असा विश्‍वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. अशोक मित्तल हे पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आलेले सदस्य असून ते जालंधर येथील नामांकित शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आहेत. 2022 साली ते प्रथमच राज्यसभेत दाखल झाले. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास ठेवत ही मोठी जबाबदारी दिल्याचे मानले जात आहे. राघव चड्ढा हे पक्षातील प्रभावी आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते. राज्यसभेत त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत सक्रिय भूमिका बजावली होती. 2022 पासून ते पंजाबमधून राज्यसभेचे सदस्य असून त्यांचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे. मात्र, अलीकडच्या काळात ते पक्षाच्या कामकाजापासून काहीसे दूर असल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त होत होते. विशेषतः काही महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी सार्वजनिक प्रतिक्रिया न दिल्याने चर्चांना अधिक बळ मिळाले.

COMMENTS