Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणाला आर्थिक गैरव्यवहारांचे नवे वळण; शेकडो खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल संशयाच्या भोवर्‍यात

अहिल्यानगर : भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणात आता गंभीर आर्थिक गैरव्यवहारांचे स्वरूप धारण केले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांन

राष्ट्रवादीचे खा.तटकरे आणि गर्जे यांच्यात खडाजंगी?निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पद टाळल्याने वाद
शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक : मुख्यमंत्री फडणवीस; नागपुरात ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पोहेगाव, दहेगाव बोलका येथे ‘महाराजस्व’ उत्साहात  

अहिल्यानगर : भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणात आता गंभीर आर्थिक गैरव्यवहारांचे स्वरूप धारण केले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांनंतर आता आर्थिक फसवणूक आणि गैरव्यवहारांचे नवे पैलू उघड होत असल्याने तपास यंत्रणांची चिंता वाढली आहे.
तपासाच्या प्राथमिक टप्प्यात समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक नागरिकांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक जाळे उभारण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. आधार आणि कायम खाते क्रमांकाच्या आधारे विविध खात्यांची चालू-बंद करण्यात आली असून, त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, विविध पतसंस्था आणि बँकांमध्ये उघडलेल्या शेकडो खात्यांवर स्वतःला नामनिर्देशित म्हणून नोंदवून घेण्यात आल्याची बाब तपासात पुढे आली आहे. अनेक खात्यांना एकाच दूरध्वनी क्रमांकाची जोडणी आढळल्याने या सर्व व्यवहारांवर एकाच व्यक्तीचा प्रभाव होता का, याचा तपास सध्या सुरू आहे. संबंधित क्रमांकाचा वापर स्वतः खरात करत असल्याचा संशय अधिक बळावत आहे.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. काही आर्थिक व्यवहारांमध्ये एका राजकीय व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीच्या नावाचा वापर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला राजकीय छटा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष तपास पथकाकडून संबंधित खात्यांचा, व्यवहारांचा आणि पतसंस्थांचा बारकाईने मागोवा घेतला जात आहे. याचबरोबर, शेतकरी फसवणुकीचाही एक गंभीर पैलू पुढे येत आहे. बनावट शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. शेतमाल खरेदी प्रक्रियेतील सवलतींचा गैरफायदा घेत, कांदा आणि मका यांसारख्या पिकांच्या खरेदीच्या नावाखाली मोठ्या व्यवहारांची साखळी तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ‘व्यंकटेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ या नावाची संस्था विशेष चर्चेत आली असून, या कंपनीत अशोक खरात आणि त्याच्या पत्नीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आणखी अनेक कंपन्यांमध्येही त्याचा संबंध असल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.

COMMENTS