Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी क्षमता ओळखून ध्येय ठरवावे-प्रियंका पवार

धर्माबाद : करखेली येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभात पोलीस उप

पुण्याऐवजी हडपसर स्थानकावरच मराठवाड्यातील रेल्वे गाड्या थांबवण्यात येणार
हिंद-दि-चादर कार्यक्रमाची पूर्वनियोजन बैठक आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत संपन्न
कुरुंदकर व्याख्यानमालेत विचारांचा दीप: डॉ. आसाराम लोमटे यांचे यंदाचे विशेष व्याख्यान

धर्माबाद : करखेली येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभात पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून योग्य ध्येय निश्चित करावे, असे त्या म्हणाल्या.
शिवकुमार पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या परीक्षेत इयत्ता चौथी ते नववीच्या 77 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 333, 222 व 111 रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात आली. एकूण 1998 रुपयांची पारितोषिके छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंडळ, करखेली यांच्या वतीने प्रदान करण्यात आली. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पेन देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी प्रियंका पवार यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, शिस्तबद्ध जीवनशैली, तसेच योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास पोलीस अंमलदार विठ्ठल सुपारे उपस्थित होते.

COMMENTS