खडसेंवर ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडसेंवर ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी : भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थ

एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर, रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती
खडसेंना संपविण्यासाठी ईडीची कारवाई : राज ठाकरे
खडसे यांची ईडीकडून चौकशी ; राजकीय हेतूने कारवाई होत असल्याचा आरोप

मुंबई/प्रतिनिधी : भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून खडसे यांची जळगाव आणि लोणावळयातील संपत्ती जप्त केल्यानंतर ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. खडसे यांची सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्याचप्रमाणे एक बँक खाते गोठवले. त्यात 86 लाख रुपये आहेत. मनी लाँडरिंग कायद्यानुसार ईडीच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. एकनाथ खडसेंविरोधात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंतची ही मोठी कारवाई आहे. यानंतर आता एकनाथ खडसेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. कारण, ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात ईडी चार्जशीट दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही चार्जशीच दाखल करण्यात येणार आहे.

COMMENTS