प्रदेश काँग्रेस समितीवर नगरच्या चौघांना संधी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदेश काँग्रेस समितीवर नगरच्या चौघांना संधी

अहमदनगर/प्रतिनिधी-प्रदेश काँग्रेस समितीवर यंदा नगर जिल्ह्यातून चौघांची वर्णी लागली आहे. ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, माजी महापौर दीप चव्हाण, उत्कर्षा

सावधान…कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय…;
मुळा 40 टक्के तर भंडारदरा निम्मे भरले ; पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; आमदार निलेश लंकेकडे रोख

अहमदनगर/प्रतिनिधी-प्रदेश काँग्रेस समितीवर यंदा नगर जिल्ह्यातून चौघांची वर्णी लागली आहे. ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, माजी महापौर दीप चव्हाण, उत्कर्षा रुपवते व सचिन गुंजाळ यांचा यात समावेश आहे. ज्येष्ठ नेते विनायक देशमुख यांना सलग दुसर्‍यांदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. अशी संधी मिळालेले ते अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव पदाधिकारी ठरले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या मान्यतेने पक्षाचे महासचिव खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातून नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. नव्या कार्यकारिणीत राज्यातून उपाध्यक्षपदी 18, सरचिटणीसपदी 65 तर सचिवपदी 104 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली. या शिवाय 6 जणांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. नवीन प्रदेश कार्यकारणीत यंदा जिल्ह्यातील चारच जणांना पदे मिळाली आहेत. प्रदेश सरचिटणीपदी देशमुख यांची नियुक्ती कायम ठेवली गेली आहे. तसेच प्रदेश सरचिटणीसपदी उत्कर्षा रुपवते यांचीही निवड जाहीर करण्यात आली आहे. तसेच काँग्रेसचे माजी नगर शहर जिल्हाध्यक्ष व माजी महापौर दीप चव्हाण आणि सचिन गुंजाळ यांना सचिवपदाची संधी मिळाली आहे.

जिल्ह्यातून एकमेव
प्रदेश काँग्रेसवर सरचिटणीसपदी सलग दुसर्‍यांदा निवड होणारे देशमुख हे नगर जिल्ह्यातील एकमेव पदाधिकारी आहेत. मागील कार्यकारिणीत देशमुखांसह माजी आमदार नंदकुमार झावरेही प्रदेश सरचिटणीस होते. पण यावेळी जिल्ह्यातून केवळ देशमुख यांनाच या पदावर काम करण्याची पुन्हा संधी दिली गेली आहे. यंदा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आलेल्या उत्कर्षा रुपवते मूळच्या नगरमधील असल्या तरी त्या सध्या मुंबईतच राहतात. देशमुख यांनी काँग्रेस पक्ष संघटनेत प्रदीर्घ काम केले असून, 1994पासून विविध पदांवर ते काम करीत आहेत. जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तसेच प्रदेश काँग्रेस योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष या पदांवर काम करताना 2016पासून ते प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहात आहेत. तसेच सध्या ते प्रदेश काँग्रेसच्या व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाऐ संविधान..या विशेष अभियानाचे राज्य समन्वयक म्हणूनही काम पाहात आहेत.

COMMENTS