Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तृणमूल काँगे्रसची 294 उमेदवारांची घोषणा; 74 विद्यमान आमदारांचा पत्ता कापला, नव्या चेहर्‍यांना संधी

कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने 294 उमेदवारांची यादी जाहीर करत मोठा रा

काँग्रेसला संधी….पण?
चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात  झालेल्या अवकाळी पाऊसामुळे कांद्यापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
नगरच्या बिग्मीद्वारे तब्बल 100 कोटींची फसवणूक; एसआयटी चौकशीची ठेवीदारांची मागणी


कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने 294 उमेदवारांची यादी जाहीर करत मोठा राजकीय संदेश दिला आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उमेदवार निवडीत मोठे बदल करत तब्बल 74 विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. ही संख्या एकूण आमदारांच्या जवळपास तृतीयांश इतकी असल्याने पक्षांतर्गत मोठा फेरबदल झाल्याचे स्पष्ट होते.
या वेळी तृणमूल काँग्रेसने 294 पैकी 291 जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून उर्वरित जागा मित्रपक्षासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारी देताना जुने चेहरे बाजूला सारून नव्या, तरुण आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सुमारे 15 आमदारांचे मतदारसंघ बदलण्यात आले आहेत, यावरून निवडणूक रणनीतीत मोठा बदल दिसून येतो. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पक्षाने चमकदार प्रतिमेच्या उमेदवारांऐवजी संघटनात्मक कामगिरीला महत्त्व दिले आहे. महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देत 52 महिलांना संधी देण्यात आली आहे. तसेच अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती आणि तरुण उमेदवारांचा मोठा समावेश करून सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसतो. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. येथे त्यांची थेट लढत भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. यापूर्वी नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवामुळे ही लढत अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे. ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर टीका करत थेट राजकीय संघर्षाला सामोरे जाण्याचे आव्हान दिले आहे. निवडणूक वातावरणात कृत्रिम अडथळे निर्माण करण्याऐवजी सरळ मैदानात उतरून सामना करावा, असा त्यांचा संदेश आहे. गेल्या दीड दशकापासून पश्‍चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांचे वर्चस्व राहिले आहे. यावेळीही विजय मिळवला तर त्या सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवणार्‍या देशातील पहिल्या महिला ठरतील. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी निर्णायक मानली जात आहे.

COMMENTS