Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर येथील अ‍ॅसिड हल्ल्याचे विधानसभेत उमटले पडसाद; आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची 10 विशेष पथके तैनात

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेली एका सहावीतील विद्यार्थिनीवरील अ‍ॅसिड हल्ल्याची घटना संपूर्ण समाजमन हादरवणारी ठरली आह

शेवगाव सायकल असोसिएशनतर्फे गुणवंत महिलांचा सन्मान
कोपरगावमध्ये जप्त वाहनांचा जाहीर लिलाव २३ मार्चला
रमजाननिमित्त खजूर वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश


अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेली एका सहावीतील विद्यार्थिनीवरील अ‍ॅसिड हल्ल्याची घटना संपूर्ण समाजमन हादरवणारी ठरली आहे. शाळा सुटल्यानंतर घराकडे परतत असताना भरदिवसा या निष्पाप मुलीवर हल्ला करण्यात आल्याने केवळ कुटुंबच नव्हे, तर परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाला असून बुधवारी त्याचे पडसाद विधानसभेत उमटले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. आरोपीचा माग काढण्यासाठी 10 विशेष पथके तैनात करण्यात आली असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू आहे. पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून तिच्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. शासनाच्या वतीने वैद्यकीय मदत आणि कुटुंबाला आवश्यक सहाय्य देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. बालकांच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, असा निर्धार सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. विरोधकांनी कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, राज्यात महिलांवरील आणि लहान मुलींवरील अत्याचारांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. इतकी गंभीर घटना घडूनही आरोपी तात्काळ पकडला जात नाही, यावरून पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच, स्थानिक प्रशासनावरही निष्क्रियतेचे आरोप करत गुन्हेगारांवर प्रभावी अंकुश नसल्यामुळे अशा घटना वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले असून या विषयावर तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सभागृहाच्या अध्यक्षांनीही सरकारला सविस्तर निवेदन करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून हा विषय केवळ एका घटनेपुरता मर्यादित न राहता राज्याच्या एकूणच कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीशी निगडित असल्याचे स्पष्ट होते. या पार्श्‍वभूमीवर काही मूलभूत प्रश्‍न पुढे येतात. महिलांवरील आणि बालिकांवरील अत्याचार रोखण्यासाठी असलेली यंत्रणा कितपत प्रभावी आहे? पोलीस दलाचा गुन्हेगारांवर असलेला धाक कमी होत चालला आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, समाजातील नैतिक मूल्यांची घसरण थांबवण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार? संगमनेरमधील ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर ती संपूर्ण व्यवस्थेला आणि समाजाला दिलेला इशारा आहे. आरोपीला तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहेच; पण त्याचबरोबर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवणेही तितकेच गरजेचे आहे. महिलांच्या आणि बालिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ठोस कृती आराखडा राबविल्याशिवाय समाजातील भीतीचे सावट दूर होणार नाही.

COMMENTS