Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; वाहतूक विस्कळीत

श्रीनगर : काश्मीर खोर्‍यातील उंच भागांमध्ये सोमवारी झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे आणि मैदानी भागात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला

मुंंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन !
मुस्लिम आरक्षण मागणी मोर्चाला ‘तुतारी’ गटाचा एकमुखी पाठिंबा; शहरातील नगरसेवकांचा सहभाग जाहीर


श्रीनगर : काश्मीर खोर्‍यातील उंच भागांमध्ये सोमवारी झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे आणि मैदानी भागात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून अनेक महत्त्वाचे मार्ग तात्पुरते बंद ठेवावे लागले आहेत. काही ठिकाणी वाहनचालक आणि पर्यटक अडकल्याच्या घटनाही घडल्या.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार बर्फवृष्टीमुळे सिंथन टॉप परिसरात अनेक वाहने अडकली होती. पोलिस आणि सैन्याच्या संयुक्त प्रयत्नांतून रविवारी रात्री बचावकार्य राबवण्यात आले. या मोहिमेत अडकलेल्या सुमारे 214 पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग, मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील दूधपथरी आणि गंदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग या पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. तसेच दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील मुघल मार्गावरील पीर की गली, झोजिला खिंड, बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ, कुपवाडा जिल्ह्यातील साधना टॉप आणि अनंतनाग ते किश्तवार जोडणारा सिंथन टॉप या उंच डोंगररांगांमध्येही बर्फाचा मोठा साठा झाला. साधना टॉप येथे बारा इंचांहून अधिक तर सिंथन टॉप येथे सुमारे सहा इंच इतकी नव्याने बर्फवृष्टी झाल्याची नोंद आहे. या बर्फवृष्टीमुळे गुरेझ-बांदीपोरा मार्ग, सिंथन-किश्तवार मार्ग तसेच काश्मीर खोर्‍याला जम्मू प्रदेशाशी जोडणारा पर्यायी मुघल मार्ग बंद करण्यात आला आहे. झोजिला खिंडीत मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्याने श्रीनगर-लेह महामार्गावरील वाहतूकही थांबवण्यात आली आहे.

COMMENTS