खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवानबाबा यांनी सुरू केलेला फिरता नारळी सप्ताह यावर्षी ३१ मार्च २०२६ पासून बडेवाडीत होत आहे. बडेवाडी ग्रामस्थांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. बडेवाडीच्या ग्रामस्थांकडून नुकतेच मुंबई येथे जाऊन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना सप्ताहासाठी निमंत्रण देण्यात आले यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी बडेवाडीला सप्ताहाला येण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले आहे. त्याचबरोबर आ. धनंजय मुंडे, यांच्यासह बाळासाहेब सानप जय भगवान महासंघ, तसेच अतुल सावे बहुजन कल्याण मंत्री, खासदार निलेश लंके, आमदार मोनिका राजळे, ऍड.प्रतापराव ढाकणे, आ. शिवाजीराव गर्जे हे प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितलं आहे. यावेळी सचिन पालवे, संतोष पालवे, किरण पालवे, नारायण पालवे, अंकुश पालवे, विजय पालवे, जनार्दन पालवे, मनोज पालवे, बाळासाहेब पालवे, अंबादास पालवे, संदीप पालवे यावेळी उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी या सप्ताहासाठी उपस्थित राहण्याची ग्वाही दिली. श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च २०२६ ते ७ एप्रिल २०२६ दरम्यान हा नारळी सप्ताह होणार आहे.

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवानबाबा यांनी सुरू केलेला फिरता नारळी सप्ताह यावर्षी ३१ मार्च २०२६ पासून बडेवाडीत होत आहे. बडेवाडी ग्रामस्थांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. बडेवाडीच्या ग्रामस्थांकडून नुकतेच मुंबई येथे जाऊन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना सप्ताहासाठी निमंत्रण देण्यात आले यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी बडेवाडीला सप्ताहाला येण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले आहे. त्याचबरोबर आ. धनंजय मुंडे, यांच्यासह बाळासाहेब सानप जय भगवान महासंघ, तसेच अतुल सावे बहुजन कल्याण मंत्री, खासदार निलेश लंके, आमदार मोनिका राजळे, ऍड.प्रतापराव ढाकणे, आ. शिवाजीराव गर्जे हे प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितलं आहे.
यावेळी सचिन पालवे, संतोष पालवे, किरण पालवे, नारायण पालवे, अंकुश पालवे, विजय पालवे, जनार्दन पालवे, मनोज पालवे, बाळासाहेब पालवे, अंबादास पालवे, संदीप पालवे यावेळी उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी या सप्ताहासाठी उपस्थित राहण्याची ग्वाही दिली. श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च २०२६ ते ७ एप्रिल २०२६ दरम्यान हा नारळी सप्ताह होणार आहे.

COMMENTS