Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा जल्लोष; आदित्य शिक्षण संस्थेच्या स्नेहसंमेलनाची उत्साहात सुरुवातपारंपरिक नृत्य, देशभक्तीपर गीत व समूह सादरीकरणांनी पहिल्या दिवसाला रंगत

बीड : विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा देखणा आविष्कार आणि उत्स्फूर्त सहभागाच्या वातावरणात येथील आदित्य शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्

शिक्षण अधिकार्‍यांच्या आडमुठपणामुळे शिक्षकांची पेन्शन रखडलीसेवानिवृत्त शिक्षक आर्थिक संकटात – सूर्यकांत जोगदंड
येडेश्वरीचे सर्वाधिक गाळप; कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या संपन्न 9.22 लाख मेट्रिक टन ऊस गाळप; खा.बजरंग सोनवणे यांनी शेतकरी-कामगारांचे केले कौतूक
चकलंबा पोलिसांची धडक मोहीम : चार कारवायांत तब्बल 37,37,830 चा मुद्देमाल जप्तजुगार, अवैध दारू विक्री, वाळू तस्करी व सोरट जुगारावर कारवाई; अनेक आरोपींवर गुन्हे दाखलचकलांबा परिसरात कोणतेही अवैध धंदे चालू देणार नाही; एपीआय सचिन इंगळे यांचा अवैध धंद्यावाल्यांना इशारा

बीड : विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा देखणा आविष्कार आणि उत्स्फूर्त सहभागाच्या वातावरणात येथील आदित्य शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहात सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्य, देशभक्तीपर गीत, नाटिका आणि समूह सादरीकरणांनी स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवसाला विशेष रंगत आणली. या सादरीकरणांना उपस्थित प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
आदित्य शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे वार्षिक स्नेहसंमेलन संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा आणि संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला बीड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा होते. यावेळी सीए गिरीश गिल्डा, संचालक डॉ. आदित्य सारडा तसेच संचालिका डॉ. आदिती सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्नेहसंमेलनांचे मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. या स्नेहसंमेलनात आदित्य शिक्षण संस्थेअंतर्गत विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कलाप्रकार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांनी नियोजनपूर्वक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले. स्नेहसंमेलनाचे पुढील दिवसही विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक कार्यक्रमांनी रंगणार असून विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. विवेक कुलकर्णी यांनी केली. सूत्रसंचालन संग्राम तनपुरे व प्रतीक्षा सुसर यांनी केले, तर आभार डॉ. अमोल सानप यांनी मानले.
विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग
या स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी आदित्य शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या दंत, आयुर्वेद, कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, नर्सिंग, फिजिओथेरपी, जीएनएम, फार्मसी, डी. फार्मसी तसेच इतर अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली.

COMMENTS