Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिजाऊ ब्रिगेड ‘एकविरा’ चषकचे मानकरी; संगमनेरमधील क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता

संगमनेर : महिलांच्या आरोग्याबरोबरच कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून झालेल्या एकविरा क्रीडा महोत्सव 2026 मध्ये ५ हजार 260 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून क्रिकेट मधील अंतिम सामन्यात जिजाऊ ब्रिगेड संगमनेरने हिरकणी वडगाव पान संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले तर रस्सीखेच मध्ये सावित्रीच्या लेकी संघाने विजेतेपद पटकावले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकविरा फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट रस्सीखेच व बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत क्रिकेटमध्ये 160 रस्सीखेच मध्ये 252 तर बॅडमिंटन मध्ये 327 संघांनी सहभाग घेतला. सात दिवस सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवात तालुक्यातील 5260 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेचा पारितोषण वितरण समारंभ अत्यंत दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. याप्रसंगी डॉ.जयश्री  थोरात, पांडुरंग पा.घुले, सौ.रचनाताई मालपाणी,ॲड.नानासाहेब शिंदे,रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, अंकुश ताजने,डॉ.हर्षवर्धन गुंजाळ,अभयसिंह जोंधळे, विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.  या महिला क्रिकेट स्पर्धेत खुल्या गटातून संगमनेर येथील जिजाऊ ब्रिगेडने अंतिम सामन्यात हिरकणी वडगाव पान संघावर 14 धावांनी मात केली व 11 हजार रुपये आणि मानाचा चषक पटकावला, द्वितीय संघाला 7000 रुपये व ट्रॉफी तर वीरांगाना पिंपळगाव माथा या संघाला तृतीय क्रमांक 5000 रुपये बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात आली. महाविद्यालयीन गटामधून सह्याद्री जुनियर कॉलेजने प्रथम क्रमांक मिळवला तर अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला द्वितीय क्रमांक मिळाला. आणि सह्याद्री सीनियर कॉलेजला तृतीय क्रमांक मिळाला. तर शालेय गटामधून श्री.श्री.रविशंकर विद्यामंदिराने सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला. तर सह्याद्री विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला. चंदनेश्वर विद्यालय चंदनपुरीला तृतीय क्रमांक मिळाला.  यावेळी बोलताना डॉ.जयश्री थोरात म्हणाले की, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य,शिक्षण, संतुलित आहार, व्यायाम याबाबत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.  या क्रीडा महोत्सवात अगदी 7 वर्षाच्या मुलीपासून 72 वर्षाच्या आजी पर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. अत्यंत आनंदाने आणि खेळीमेळीने झालेल्या या स्पर्धा नक्कीच ऊर्जा देणाऱ्या आहेत.

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शेवगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा; मोफत भाजीपाला वाटप करून निषेध
समाजाच्या उत्कर्षासाठी स्व.शंकरराव कोल्हेंचे योगदान : ह.भ.प. शेवाळे

संगमनेर : महिलांच्या आरोग्याबरोबरच कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून झालेल्या एकविरा क्रीडा महोत्सव 2026 मध्ये ५ हजार 260 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून क्रिकेट मधील अंतिम सामन्यात जिजाऊ ब्रिगेड संगमनेरने हिरकणी वडगाव पान संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले तर रस्सीखेच मध्ये सावित्रीच्या लेकी संघाने विजेतेपद पटकावले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकविरा फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट रस्सीखेच व बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत क्रिकेटमध्ये 160 रस्सीखेच मध्ये 252 तर बॅडमिंटन मध्ये 327 संघांनी सहभाग घेतला.

सात दिवस सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवात तालुक्यातील 5260 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेचा पारितोषण वितरण समारंभ अत्यंत दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. याप्रसंगी डॉ.जयश्री  थोरात, पांडुरंग पा.घुले, सौ.रचनाताई मालपाणी,ॲड.नानासाहेब शिंदे,रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, अंकुश ताजने,डॉ.हर्षवर्धन गुंजाळ,अभयसिंह जोंधळे, विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 या महिला क्रिकेट स्पर्धेत खुल्या गटातून संगमनेर येथील जिजाऊ ब्रिगेडने अंतिम सामन्यात हिरकणी वडगाव पान संघावर 14 धावांनी मात केली व 11 हजार रुपये आणि मानाचा चषक पटकावला, द्वितीय संघाला 7000 रुपये व ट्रॉफी तर वीरांगाना पिंपळगाव माथा या संघाला तृतीय क्रमांक 5000 रुपये बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात आली. महाविद्यालयीन गटामधून सह्याद्री जुनियर कॉलेजने प्रथम क्रमांक मिळवला तर अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला द्वितीय क्रमांक मिळाला. आणि सह्याद्री सीनियर कॉलेजला तृतीय क्रमांक मिळाला. तर शालेय गटामधून श्री.श्री.रविशंकर विद्यामंदिराने सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला. तर सह्याद्री विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला. चंदनेश्वर विद्यालय चंदनपुरीला तृतीय क्रमांक मिळाला.

 यावेळी बोलताना डॉ.जयश्री थोरात म्हणाले की, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य,शिक्षण, संतुलित आहार, व्यायाम याबाबत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.  या क्रीडा महोत्सवात अगदी 7 वर्षाच्या मुलीपासून 72 वर्षाच्या आजी पर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. अत्यंत आनंदाने आणि खेळीमेळीने झालेल्या या स्पर्धा नक्कीच ऊर्जा देणाऱ्या आहेत.

COMMENTS