Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरडगाव थडी येथे 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

देवळाली प्रवरा : पंधरा दिवसापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या ४० वर्षीय महिलेचा दि. १३ मार्च रोजी दुपारच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घ

माळीवाडा वेस न पाडता तिचे जतन करावे; खा. लंके यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : डॉ. प्रतिभा पाचपुते
रमजाननिमित्त खजूर वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश

देवळाली प्रवरा : पंधरा दिवसापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या ४० वर्षीय महिलेचा दि. १३ मार्च रोजी दुपारच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेतलेलया अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना राहुरी तालुक्यातील दरडगाव येथे घडली असून नातेवाईकांनी चार जणांवर संशय व्यक्त करून महिलेचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला.

या घटनेतील मयत जया नामदेव हारदे (वय ४० वर्षे, रा. दरडगाव, ता. राहुरी) यांनी सुमारे १५ दिवसापूर्वी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्यावेळी त्यांचा जीव वाचला. दि. १३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान जया हारदे ह्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. परिसरातील नागरिकांनी त्यांना ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी प्रवीण शिरसागर यांनी उपचारा पूर्वीच त्यांना मयत घोषित केले.

यावेळी मयत जया हारदे यांची मुलगी व मुलाने सांगीतले कि, शेतीच्या कारणावरुन जया हारदे यांचा सासरच्या लोकांकडून छळ सुरु होता.  मयत जया हारदे यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळून जया हारदे यांनी आत्महत्या केली किंवा  त्यांना मारुन टाकले असावे असा संशय व्यक्त करण्यात आला.

COMMENTS