कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजने अंतर्गत मंजूर झालेल्या नाल्यावरील सी.डी. वर्कच्या कामाचे भूमिपूजन होऊन तब्बल चार महिने झाले आहेत. मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. या दिरंगाईमुळे नागरिकांच्या अडचणी येत असून या कामाबरोबरच इतर मंजूर कामेही तातडीने सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे केली आहे. कोपरगाव शहराच्या विकास आराखड्यानुसार प्रभाग क्रमांक १४ मधील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी नाल्यावर सी.डी. वर्कचे काम शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेतून मंजूर झाले असून यासाठीचा निधी उपलब्ध होऊन या कामाचे उद्घाटन देखील झाले आहे. मात्र भूमिपूजनाचा नारळ फुटल्यानंतर ठेकेदार आणि प्रशासनाने या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या रखडलेल्या कामामुळे प्रभागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नाल्याचे काम रखडल्याने सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. विकास कामी मंजूर असूनही केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन तातडीने काम सुरु करण्याची मागणी नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. यावेळी गणेश बोरुडे, तेजस साबळे, यश गुमस्ते आदी उपस्थित होते.

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजने अंतर्गत मंजूर झालेल्या नाल्यावरील सी.डी. वर्कच्या कामाचे भूमिपूजन होऊन तब्बल चार महिने झाले आहेत. मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. या दिरंगाईमुळे नागरिकांच्या अडचणी येत असून या कामाबरोबरच इतर मंजूर कामेही तातडीने सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे केली आहे.
कोपरगाव शहराच्या विकास आराखड्यानुसार प्रभाग क्रमांक १४ मधील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी नाल्यावर सी.डी. वर्कचे काम शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेतून मंजूर झाले असून यासाठीचा निधी उपलब्ध होऊन या कामाचे उद्घाटन देखील झाले आहे. मात्र भूमिपूजनाचा नारळ फुटल्यानंतर ठेकेदार आणि प्रशासनाने या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
या रखडलेल्या कामामुळे प्रभागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नाल्याचे काम रखडल्याने सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. विकास कामी मंजूर असूनही केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन तातडीने काम सुरु करण्याची मागणी नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. यावेळी गणेश बोरुडे, तेजस साबळे, यश गुमस्ते आदी उपस्थित होते.

COMMENTS