कोपरगाव : तालुक्यात गजबजलेल्या वारी गावात एक लाख लीटर क्षमतेची बारा मीटर उंचीची पाणी टाकी ४ मार्चला मध्यरात्री अचानक कोसळली. वर्दळीचा परिसर असुनदेखील घटना मध्यरात्री घडल्यामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नसल्यामुळे प्रशासनाला या घटनेचा फारसा सामना करावा लागला नाही. केवळ स्थळपाहणी करुन कागदी घोडे नाचवण्याचे काम सध्या सुरु आहे. टाकी कोसळली एक मात्र या निमित्ताने उपस्थित झालेले प्रश्न अनेक आहे. मागास क्षेत्र अनुदान निधी व १३ वा वित्त आयोग ग्रामपंचायतस्तर अंतर्गत प्रशासकिय मंजुरी रक्कम १४ लाख ८९ हजार ६२५ रुपये असून गुलाब रामकृष्ण पटारे, या वारीच्या एजन्सीने दि.३० मार्च २०१५ रोजी पुर्ण करण्यात येऊन सदर टाकीद्वारे गावास वाडया वस्त्यांना नियमितपणे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. म्हणजे दहा वर्ष अकरा महिन्यात टाकी अचानक कोसळली. त्यामुळे कामाचा निकृष्ट दर्जा आणि पारदर्शी प्रशासकीय कारभार अधोरेखित करण्याचे काम उरले नाही. या घटनेच्या अनुषंगाने तालुक्यात किती पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत? याबाबत पंचायत समीती पाणीपुरवठा विभाग बांधकाम विभागाकडे आकडेवारीच नसून पूर्णपणे ते अनभिज्ञ असल्यामुळे तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे.जर आकडेवारीच यांना माहित नाही तर खरंच पाणी टाक्या बांधकामांवर यांनी देखरेख केली असेल का?अशा स्वरुपाचे अनेक प्रश्न उपस्थित झाले असुन आता या प्रश्नांची उत्तरे पाणीपुरवठा विभागाला द्यावेच लागतील. पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडून आठ दिवस उलटली बांधकामाचा निकृष्टदर्जा यास कारणीभूत होता हे सांगण्यास कुण्या ज्योतिषाची गरज नाही तरी देखील आजपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने कुणावरही जबाबदारी निश्चित केलेली नाही. याशिवाय तसा गुन्हाही दाखल केला नाही.मात्र यात ऐन उन्हाळ्यात या गावाची पाण्यासाठी हेळसांड होणार आहे याची आणि दुर्घटनेची नैतिक जबाबदारी कुणाची हे नागरिकांना समजणे तितकेच गरजेचे आहे. टाकीचे आयुर्मान बांधकामापासून तीस वर्षांपर्यंत होते तर ती अल्पावधीत का कोसळली? बचावत्मक पवित्रा घेऊन सांगितले जाते की टाकीच्या पृष्ठभागावर पाणी साठत असल्यामुळे टाकी कोसळली असावी मग त्यावेळी तेथील भौगोलिक परिस्थिती पाणीपुरवठा विभागाने लक्षात का घेतली नाही? तालुक्यात ज्या टाक्यांचे आयुर्मान पूर्ण झाले आहे त्या पाडण्याची मोहीम प्रशासनाने का राबवू नये? ज्या टाक्यांचे आयर्मान बाकी आहे त्यांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट का करू नये? जीवित हानी टाळण्यासाठी टाकीच्या उंचीच्या परिघात लोकवस्ती नसावी आणि टाकीला कंपाऊंड का करू नये? अशे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.टाकीच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोसळलेल्या पाणी टाकीचा अहवाल अद्याप आलेला नसल्यामुळे जबाबदारी निश्चित करता आली नाही. अजून चौकशी सुरू आहे. पाणीपुरवठा उप अभियंता सध्या परीक्षेला असल्यामुळे त्यांना विचारून चौकशी पूर्ण होण्यास किती कालखंड लागेल ते कळवतो. – संदीप दळवी, गटविकास अधिकारी, कोपरगाव.

कोपरगाव : तालुक्यात गजबजलेल्या वारी गावात एक लाख लीटर क्षमतेची बारा मीटर उंचीची पाणी टाकी ४ मार्चला मध्यरात्री अचानक कोसळली. वर्दळीचा परिसर असुनदेखील घटना मध्यरात्री घडल्यामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नसल्यामुळे प्रशासनाला या घटनेचा फारसा सामना करावा लागला नाही. केवळ स्थळपाहणी करुन कागदी घोडे नाचवण्याचे काम सध्या सुरु आहे. टाकी कोसळली एक मात्र या निमित्ताने उपस्थित झालेले प्रश्न अनेक आहे.
मागास क्षेत्र अनुदान निधी व १३ वा वित्त आयोग ग्रामपंचायतस्तर अंतर्गत प्रशासकिय मंजुरी रक्कम १४ लाख ८९ हजार ६२५ रुपये असून गुलाब रामकृष्ण पटारे, या वारीच्या एजन्सीने दि.३० मार्च २०१५ रोजी पुर्ण करण्यात येऊन सदर टाकीद्वारे गावास वाडया वस्त्यांना नियमितपणे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. म्हणजे दहा वर्ष अकरा महिन्यात टाकी अचानक कोसळली. त्यामुळे कामाचा निकृष्ट दर्जा आणि पारदर्शी प्रशासकीय कारभार अधोरेखित करण्याचे काम उरले नाही.
या घटनेच्या अनुषंगाने तालुक्यात किती पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत? याबाबत पंचायत समीती पाणीपुरवठा विभाग बांधकाम विभागाकडे आकडेवारीच नसून पूर्णपणे ते अनभिज्ञ असल्यामुळे तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे.जर आकडेवारीच यांना माहित नाही तर खरंच पाणी टाक्या बांधकामांवर यांनी देखरेख केली असेल का?अशा स्वरुपाचे अनेक प्रश्न उपस्थित झाले असुन आता या प्रश्नांची उत्तरे पाणीपुरवठा विभागाला द्यावेच लागतील.
पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडून आठ दिवस उलटली बांधकामाचा निकृष्टदर्जा यास कारणीभूत होता हे सांगण्यास कुण्या ज्योतिषाची गरज नाही तरी देखील आजपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने कुणावरही जबाबदारी निश्चित केलेली नाही. याशिवाय तसा गुन्हाही दाखल केला नाही.मात्र यात ऐन उन्हाळ्यात या गावाची पाण्यासाठी हेळसांड होणार आहे याची आणि दुर्घटनेची नैतिक जबाबदारी कुणाची हे नागरिकांना समजणे तितकेच गरजेचे आहे.
टाकीचे आयुर्मान बांधकामापासून तीस वर्षांपर्यंत होते तर ती अल्पावधीत का कोसळली? बचावत्मक पवित्रा घेऊन सांगितले जाते की टाकीच्या पृष्ठभागावर पाणी साठत असल्यामुळे टाकी कोसळली असावी मग त्यावेळी तेथील भौगोलिक परिस्थिती पाणीपुरवठा विभागाने लक्षात का घेतली नाही? तालुक्यात ज्या टाक्यांचे आयुर्मान पूर्ण झाले आहे त्या पाडण्याची मोहीम प्रशासनाने का राबवू नये? ज्या टाक्यांचे आयर्मान बाकी आहे त्यांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट का करू नये? जीवित हानी टाळण्यासाठी टाकीच्या उंचीच्या परिघात लोकवस्ती नसावी आणि टाकीला कंपाऊंड का करू नये? अशे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.टाकीच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोसळलेल्या पाणी टाकीचा अहवाल अद्याप आलेला नसल्यामुळे जबाबदारी निश्चित करता आली नाही. अजून चौकशी सुरू आहे. पाणीपुरवठा उप अभियंता सध्या परीक्षेला असल्यामुळे त्यांना विचारून चौकशी पूर्ण होण्यास किती कालखंड लागेल ते कळवतो.
– संदीप दळवी, गटविकास अधिकारी, कोपरगाव.

COMMENTS