Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजाणी; ४ लाख घरांची बांधकामे पूर्ण : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई : राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून घरकुल योजनेचे काम वेगाने सुरु आहे. राज्यात मागील सात ते आठ महिन्यात

कोपरगावमध्ये 48 घरकुलांना मंजुरी : नगराध्यक्ष संधान
शेवगावमध्ये पाच हजार घरकुले रद्द होण्याची शक्यता; ३१ मार्चपर्यंत बांधकाम सुरू न केल्यास कारवाई; पंचायत समितीचा इशारा
कोपरगावमध्ये जप्त वाहनांचा जाहीर लिलाव २३ मार्चला

मुंबई : राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून घरकुल योजनेचे काम वेगाने सुरु आहे. राज्यात मागील सात ते आठ महिन्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत  चार लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप, चंद्रकांत रघुवंशी यांनी सहभाग घेतला.
ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले की, राज्यातील पात्र कुटुंबांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर उपलब्ध करून देण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. बेघरांना घर मिळावे यासाठी शासनाने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. शासकीय जमीन, गायरान किंवा गावठाणातील जमीन उपलब्ध असल्यास ती देण्याची तरतूद आहे. जमीन उपलब्ध नसल्यास जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, या घरकुलासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानात राज्य शासनाने अतिरिक्त ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात एका घरकुलासाठी  २ लाख १० हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील  घरकुलांना अनुदान वाढवून मिळण्याबाबत केंद्र शासनाकडे  मागणी करण्यात आली असल्याचेही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS