Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतात अफूची लागवड; ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चापडगाव येथिल शेतकरी ताब्यात कर्जत : तालुक्यातील चापडगाव येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या अफूच्या झाडांची लागवड करून त्याची जोपासना करणाऱ्या एका व्यक्तीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल ४७ लाख ६४ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या लागवडीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात तपास सुरू होता. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत चापडगाव येथील परमेश्वर बन्सी घनवट (वय ६८) हा आपल्या शेतात अफूच्या झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे कर्जत पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चापडगाव शिवारातील गट क्रमांक १३ येथे छापा टाकला. या कारवाईत शेतात मोठ्या प्रमाणावर अफूची झाडे लागवड केलेली आढळून आली. आरोपी शेतातच झाडांची राखण करताना आढळून आला. चौकशीत त्याने दोन ते तीन महिन्यांपूर्वी अफूची लागवड करून त्याची निगा राखत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या शेतातून २३८.२३९ किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली असून त्याची बाजारमूल्य ४७ लाख ६४ हजार १८० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधिद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.

विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन
आयटीआयमध्ये पाटण येथील मनिष जाधव तालुक्यात प्रथम
जिल्हा रुग्णालयात संविधान दिन साजरा

चापडगाव येथिल शेतकरी ताब्यात

कर्जत : तालुक्यातील चापडगाव येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या अफूच्या झाडांची लागवड करून त्याची जोपासना करणाऱ्या एका व्यक्तीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल ४७ लाख ६४ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या लागवडीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात तपास सुरू होता. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत चापडगाव येथील परमेश्वर बन्सी घनवट (वय ६८) हा आपल्या शेतात अफूच्या झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे कर्जत पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चापडगाव शिवारातील गट क्रमांक १३ येथे छापा टाकला. या कारवाईत शेतात मोठ्या प्रमाणावर अफूची झाडे लागवड केलेली आढळून आली. आरोपी शेतातच झाडांची राखण करताना आढळून आला. चौकशीत त्याने दोन ते तीन महिन्यांपूर्वी अफूची लागवड करून त्याची निगा राखत असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीच्या शेतातून २३८.२३९ किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली असून त्याची बाजारमूल्य ४७ लाख ६४ हजार १८० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधिद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.

COMMENTS