Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड ग्रामीण पोलीस उप विभागासाठी  मोबाईल फॉरेन्सिक  व्हॅन  उपलब्ध   

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीस उपविभागासाठी शासनातर्फे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या

बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीपल्स हायस्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम
रुद्राणी कन्स्ट्रक्शनचा शेतकर्‍याला फटका
नांदेड महापौरपदाची रंगतदार चढाओढ : महिलाराज की राजकीय डावपेच

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीस उपविभागासाठी शासनातर्फे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 176(3) अन्वये सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असणार्‍या गुन्ह्यात फॉरेन्सिक पथकाची भेट अनिवार्य करण्यात आली आहे.
या अनुषंगाने येथील नांदेड ग्रामीण उपविभागासाठी एम.एच.12 झेड.सी.9869 ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन विविध रसायने, साधनसामुग्री व कर्मचार्‍यांच्या दोन गटांसह उपलब्ध झाली असून या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे मुख्यालय अर्धापूर येथे अहोरात्र राहील. या पोलीस उपविभागा अंतर्गत येणार्‍या अर्धापूर, बारड,मुदखेड व लिंबगाव पोलीस स्टेशनच्या तपासिक अंमलदारांनी गुन्ह्यांच्या  घटनास्थळावरील अधिक पुरावे जमा करण्यासाठी  या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या  पथकाचा  चा उपयोग घेऊन अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजीवन मिरकले यांनी केले आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्र वानी,सपोउपनी चाऊस,सय्यद सलीम यांचा सह मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS