दहशतवादी संघटनांशी संबंध; मुंबईत अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक

Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

दहशतवादी संघटनांशी संबंध; मुंबईत अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक

मुंबई : दहशतवादी संघटनांशी संबंधित संशयास्पद हालचालींप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक केली आहे. अय

शेतकर्‍यांना दोन लाखांची कर्जमाफीअर्थसंकल्पात घोषणा ; योजनेला अहिल्यादेवींचे नाव
शिरूरमधून आमचाच उमेदवार निवडून आणू
देशांतर्गत इंधनदर स्थिर राहण्याची शक्यता

मुंबई : दहशतवादी संघटनांशी संबंधित संशयास्पद हालचालींप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक केली आहे. अयान शेख (वय 21) असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दहशतवादविरोधी पथकाने 2 मार्च रोजी मुंबईतील कुर्ला, गोवंडी आणि शिवाजीनगर परिसरात छापे टाकले होते. प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या ऑनलाईन प्रचाराबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अयान शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. प्राथमिक चौकशीनंतर त्याला औपचारिकरीत्या अटक करण्यात आली. तपासादरम्यान अधिकार्‍यांनी त्याच्याकडील संगणक, भ्रमणध्वनी आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली असून ती न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. या साधनांमधून काही संशयास्पद ध्वनीचित्रफिती आणि संदेश आढळल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

अधिकार्‍यांच्या मते, अयान शेख हा प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी संबंधित प्रचारात्मक ध्वनी-चित्रफिती इतरांना पाठवत होता. त्याने आपल्या दोन अभियांत्रिकी शिक्षण घेणार्‍या मित्रांना अतिरेकी विचारसरणीचे साहित्य दाखवून त्यांना काही गटांमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात तो काही महिन्यांपासून अशा गटांशी संपर्कात असल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच परदेशातून त्याला आर्थिक मदत मिळाल्याची शक्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत. ही रक्कम आभासी चलनाच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा संशय असल्याने त्याचा आर्थिक मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी त्याची बँक खाती आणि व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात सामाजिक माध्यमे आणि गुप्त संदेशवहन माध्यमांद्वारे अतिरेकी विचारसरणीचा प्रसार होत असल्याचा तपास सुरू आहे. 18 ते 23 वयोगटातील आणखी तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात येत असून तपास यंत्रणा पुढील धागेदोरे शोधत आहेत.

COMMENTS