तांदळवाडी घाट । प्रतिनिधीतांदळवाडी घाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमा

तांदळवाडी घाट । प्रतिनिधी
तांदळवाडी घाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी तांदळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. श्यामजी डाके यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रयोगांचे निरीक्षण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत त्यांनी प्रयोगातून शिकलेले विज्ञान विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहते असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रासायनिक अभिक्रिया, हवेचा दाब, घर्षण बल, स्थिर विद्युत, घनता, साधा विद्युत परिपथ, पृष्ठतनाव, पाणी शुद्धीकरण, सौर ऊर्जा तसेच हायड्रॉलिक गउइ मॉडेल यांसारखे विविध विज्ञान प्रयोग सादर केले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पदार्थांची चव ओळखण्याचा उपक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून विज्ञानातील संकल्पना प्रभावीपणे मांडल्या. या प्रयोगांसाठी श्री. भगवान वाघमारे सर, श्री. महेश फसले सर व श्रीमती सुनीता शिंदे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व जिज्ञासा वाढीस लागून विज्ञान विषय अधिक रंजक होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.


COMMENTS