एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्याने घेतला निर्णयओस्लो : नार्वेचे माजी पंतप्रधान थोरबजॉर्न जगलंड यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असू

एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्याने घेतला निर्णय
ओस्लो : नार्वेचे माजी पंतप्रधान थोरबजॉर्न जगलंड यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. या घटनेमुळे नॉर्वेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जगलंड यांचे नाव तथाकथित ‘एपस्टाईन फाइल्स’मध्ये आल्याची चर्चा रंगली आहे. अमेरिकन वित्तीय गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरलेला उद्योजक जेफ्री एपस्टीन याच्याशी कथित संबंधांमुळे त्यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. मात्र, जगलंड यांनी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. एपस्टीनसोबतचा संपर्क हा चुकीचा निर्णय होता, असे मान्य करत त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. जगलंड हे नॉर्वेचे माजी पंतप्रधान असून, ते नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष तसेच युरोप परिषदचे महासचिव म्हणूनही कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या नावावर झालेल्या आरोपांकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष लागले आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांमध्ये जगलंड आणि एपस्टीन यांच्यातील संपर्काचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. त्यात पॅरिस, न्यूयॉर्क आणि पाम बीच येथील मालमत्तांना भेटी दिल्याचा उल्लेख आहे. तसेच एपस्टीनच्या ‘लिटल सेंट जेम्स’ या खासगी बेटावरील संभाव्य भेटीबाबतही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. संवादामध्ये जगलंड यांना नोबेल बिग शॉट असे संबोधण्यात आल्याचा दावाही काही अहवालांत करण्यात आला आहे. याशिवाय, एपस्टीनने काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी जगलंड यांची मदत मागितल्याचा आरोपही पुढे आला आहे. मात्र या सर्व दाव्यांबाबत अधिकृत चौकशी सुरू असून, दोष सिद्ध झाल्यास गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा आहे. नॉर्वेची आर्थिक गुन्हे तपास संस्था ओकोक्रिम या प्रकरणाचा तपास करत आहे. ओस्लोतील त्यांच्या निवासस्थानी तसेच इतर मालमत्तांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. तपासाचा मुख्य मुद्दा म्हणजे, अधिकृत पदाचा गैरवापर करून कथित लाभ घेतला गेला का, याचा शोध घेणे.

COMMENTS