Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकरुखे गावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

राहाता : तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने एकरुखे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन करून आरती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी गावातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा एकरुखे येथील वज्रेश्वरी प्रतिष्ठान तर्फे त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक हभप श्रीराम महाराज आग्रे होते. वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे युवा अध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवेंद्र भवर यावेळी म्हणाले की आपल्या गावातील मुले मुली तसेच महिला पुरुष आज विविध क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या कंपनीमध्ये तसेच सरकारी क्षेत्रामध्ये न्यायालयामध्ये आयटी क्षेत्रामध्ये, नर्मदा परिक्रमा केलेले जेष्ठ नागरिक, इस्रो मध्ये कार्यरत आहे. अशा युवकांचा आपल्या प्रतिष्ठान तर्फे त्यांचा सन्मान आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केला जात आहे. आज मला अभिमान वाटतो की आपल्या गावातील तरुण मुले दुसऱ्या गावामध्ये जाऊन उंच भरारी घेत आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप श्रीराम महाराज आग्रे व राहाता प्रेस क्लबचे रामभाऊ लोंढे,धापटकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भवर यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवेंद्र भवर, गणेश थोरात, संदीप क्षीरसागर, दिनेश सापिके यांच्यासह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. आभार वाल्मीक सातव यांनी मानले.

मिळकतीच्या सर्वेक्षणासाठी राहता नगरपरिषदेत अत्याधुनिक तंत्रज्ञान
प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. विखे; राहात्यात जल्लोष
राहात्यात कोंबडीच्या आमिषाने बिबट्या जेरबंद

राहाता : तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने एकरुखे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन करून आरती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी गावातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा एकरुखे येथील वज्रेश्वरी प्रतिष्ठान तर्फे त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक हभप श्रीराम महाराज आग्रे होते.

वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे युवा अध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवेंद्र भवर यावेळी म्हणाले की आपल्या गावातील मुले मुली तसेच महिला पुरुष आज विविध क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या कंपनीमध्ये तसेच सरकारी क्षेत्रामध्ये न्यायालयामध्ये आयटी क्षेत्रामध्ये, नर्मदा परिक्रमा केलेले जेष्ठ नागरिक, इस्रो मध्ये कार्यरत आहे. अशा युवकांचा आपल्या प्रतिष्ठान तर्फे त्यांचा सन्मान आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केला जात आहे. आज मला अभिमान वाटतो की आपल्या गावातील तरुण मुले दुसऱ्या गावामध्ये जाऊन उंच भरारी घेत आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.

या दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप श्रीराम महाराज आग्रे व राहाता प्रेस क्लबचे रामभाऊ लोंढे,धापटकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भवर यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवेंद्र भवर, गणेश थोरात, संदीप क्षीरसागर, दिनेश सापिके यांच्यासह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. आभार वाल्मीक सातव यांनी मानले.

COMMENTS