Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज

पुणे ः ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत स्थिर आणि समाधानकारक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने जाहीर केले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांच

बंडखोरांनी माझा फोटो वापरू नये
फडणवीसांची माफी म्हणजेच कबुलीनामा ः शरद पवार
सरोदे परिवाराकडून भाविकांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शन यात्रा

पुणे ः ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत स्थिर आणि समाधानकारक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने जाहीर केले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, उपचारांना त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्णालयाचे अध्यक्ष आणि प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, पवार यांच्या आरोग्यस्थितीत सातत्याने सुधारणा झाली आहे. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे निदान झाले असून पुढील काही दिवस विश्रांती घेणे आवश्यक आहे, असा सल्ला देण्यात आला आहे. शरीराला पूर्ण बळ मिळावे आणि पुढील कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी तातडीने व्यस्त कार्यक्रम टाळावेत, असेही वैद्यकीय पथकाने सुचविले आहे. ज्येष्ठ राजकारणी म्हणून पवार यांचे सार्वजनिक जीवन अत्यंत व्यस्त राहिले आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने विश्रांतीला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते टप्प्याटप्प्याने आपल्या नियमित कामकाजाकडे वळतील. सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही ते नियोजनबद्ध पद्धतीने सहभागी होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. या अधिकृत निवेदनानंतर समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत विविध अंदाज व्यक्त होत होते. मात्र वैद्यकीय पथकाच्या अहवालामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

COMMENTS