Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरपरिषद आयोजित शिवजयंती उत्साहात होणार : नगराध्यक्ष संधान

कोपरगाव   : नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शासकीय शिवजयंती अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, विचार आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली. शिवजयंतीच्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात पारंपरिक पद्धतीने शिवाभिषेक व शिवजन्म सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर शिवरायांच्या कार्याला अभिवादन करणारे विविध प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  सायंकाळी नागरिकांच्या सहभागातून कार्यक्रमांची मालिका सादर केली जाणार आहे.या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या परिसरात आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार आहे. प्रकाशयोजना, फुलांची सजावट तसेच स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने नटविण्यात येणार आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना अभिमान वाटावा, अशी भव्य व शिस्तबद्ध शिवजयंती साजरी करण्याचा नगरपरिषदेचा संकल्प असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले. या शासकीय शिवजयंती सोहळ्यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहनही नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का ? -विवेक कोल्हे
गौतम’च्या संगणक विभागाचा ‘सुनंदा इन्फोटेक’शी करार
ज्ञानज्योती सावित्रीबाईंचा त्याग मोठा : डॉ. ठाणगे

कोपरगाव   : नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शासकीय शिवजयंती अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, विचार आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.

शिवजयंतीच्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात पारंपरिक पद्धतीने शिवाभिषेक व शिवजन्म सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर शिवरायांच्या कार्याला अभिवादन करणारे विविध प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 सायंकाळी नागरिकांच्या सहभागातून कार्यक्रमांची मालिका सादर केली जाणार आहे.या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाच्या परिसरात आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार आहे. प्रकाशयोजना, फुलांची सजावट तसेच स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने नटविण्यात येणार आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना अभिमान वाटावा, अशी भव्य व शिस्तबद्ध शिवजयंती साजरी करण्याचा नगरपरिषदेचा संकल्प असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले.

या शासकीय शिवजयंती सोहळ्यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहनही नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

COMMENTS