तहसीलदार देवरेंना न्याय मिळण्यासाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदार देवरेंना न्याय मिळण्यासाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना आक्रमकपारनेर/प्रतिनिधी- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी करणारे

अहमदनगर जिल्ह्यातील 3 लाख हेक्टरवरील पिके अडचणीत
गुटका-मावा माफियांना पोलिसांचा दणका, 10 लाखाचा माल जप्त;11 जणांना केली अटक
जिल्ह्यात अजून सहा पोलिस ठाणी होऊ शकतात…; प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत, राजकीय ताकद लावण्याची गरज

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना आक्रमक
पारनेर/प्रतिनिधी- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. सात दिवसात वरिष्ठ महिला अधिकार्‍यांची समिती स्थापन करून देवरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पारदर्शक चौकशी व्हावी. अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा या पत्रात दिला गेला आहे. दरम्यान, सोमवारी (दि.23) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले गेले आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेले राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यासंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी राज्यस्तरावरून वरिष्ठ महिला अधिकार्‍यांची स्वतंत्र समिती सात दिवसाच्या आत स्थापन करून व या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून तहसीलदार देवरे यांना न्याय देण्यात यावा, यासाठी पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवले आहे. याबाबत संघटनेने म्हटले आहे की, पारनेरच्या तहसीलदार देवरे यांची महिला अधिकारी म्हणून कुचंबणा व अवहेलना होत असल्याचे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कामकाजादरम्यान प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अडथळा निर्माण केला जात असल्याने अशा प्रकारे एखाद्या क्षेत्रीय स्तरावर काम करणार्‍या महिला अधिकार्‍यांची कुचंबणा व अवहेलना होण्याच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना निषेध व्यक्त करत आहे. यात पुढे म्हटले आहे की, एका कर्तव्यदक्ष महिला अधिकार्‍यांविरोधात मर्जीने कामे न केल्याने तसेच त्यांच्यावर वचक निर्माण करण्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर दबाव टाकून वरिष्ठांमार्फत पाहिजे तशी चुकीच्या पद्धतीने चौकशी करून कारवाईचा प्रस्ताव शासनास पाठवल्याचे दिसून येते तसेच इतर लोकांकडून तक्रारी लिहून घेऊन गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, त्यांच्यावर खोट्या तक्रारी करून कारवाईचा धाक दाखवून त्यांच्यावर प्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने वरिष्ठांना कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यास बाध्य केल्याचे दिसून येते व ही निश्‍चितच गंभीर बाब आहे. यापूर्वीच्या नजीकच्या काळात अशा प्रकारे अनेक महिला अधिकारी व इतर अधिकारी यांच्याविरोधात केवळ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने कामे न केल्यामुळे दबाव टाकून वरिष्ठांमार्फत पाहिजेत तशी चुकीच्या पद्धतीने चौकशी करून कारवाईचे प्रस्ताव पाठविल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निश्‍चितच महिला अधिकारी व इतर अधिकारी यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असून अशा घटनांमधून प्रसंगी महिला अधिकार्‍यांचे करियर्स पणाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती यात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत राज्य स्तरावरून वरिष्ठ महिला अधिकारी यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती तत्काळ स्थापन करून या समितीमार्फत पारदर्शक चौकशी करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी पारदर्शक न झाल्यास संघटनेस आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देताना या घटनेच्या निषेधार्थ 23 रोजी सकाळी अकरा वाजता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकत्रित येऊन काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी घेतला आहे. या प्रकरणी राज्यस्तरावरून वरिष्ठ महिला अधिकार्‍यांची स्वतंत्र समिती सात दिवसाच्या आत स्थापन करून प्रकरणाची पारदर्शक चौकशी तात्काळ पूर्ण करून तहसीलदार देवरे यांना न्याय देण्यात यावा. राज्यस्तरीय समिती स्थापन करून न्याय न दिल्यास संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यात दिला आहे.

COMMENTS