Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंद-दि-चादर कार्यक्रमाची पूर्वनियोजन बैठक आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत संपन्न

नांदेड । प्रतिनिधीश्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त नांदेड येथील मोदी ग्राऊंडवर होणार्‍या भव्य हिंद-दि-चादर कार्यक

तामसात एचपी पेट्रोलपंप बंद; कृत्रिम टंचाईमुळे नागरिक व शेतकरी त्रस्त
नांदेडकरांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड । प्रतिनिधी
श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त नांदेड येथील मोदी ग्राऊंडवर होणार्‍या भव्य हिंद-दि-चादर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. 22 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात महत्त्वपूर्ण पूर्वनियोजन बैठक पार पडली. ही बैठक कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बाहेरून येणार्‍या भाविक व मान्यवरांचे स्वागत, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता, लंगर व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत प्रशासन व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. यावेळी बोलताना आमदार  चिखलीकर म्हणाले, सेवा हाच खरा धर्म आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सेवा भावनेतून बाहेरून येणार्‍या सर्व पाहुण्यांचा सन्मान करावा. गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवतेसाठी सदैव प्रेरणादायी आहे. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, माजी आमदार मोहन हंबर्डे, सुभाषराव साबणे, ओमप्रकाश पोकर्णा, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यास हा शहीदी समागम ऐतिहासिक व यशस्वी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

COMMENTS