Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरकुल हप्त्यांवर प्रशासनाची दिरंगाई

दलित पँथरचा 26 जानेवारीला शोले स्टाईल आंदोलनाचा इशाराबीड । प्रतिनिधीबीड शहरातील घरकुल योजनेचे हप्ते अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने

Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी
जिल्हा वाहतूक शाखा, बीड यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम
हार्टअटॅकने निधन झालेल्या खातेदाराच्या गोल्ड लोनचा इन्शुरन्स मंजूर; वारसदारांना दागिने सुपूर्त

दलित पँथरचा 26 जानेवारीला शोले स्टाईल आंदोलनाचा इशारा
बीड । प्रतिनिधी
बीड शहरातील घरकुल योजनेचे हप्ते अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेकडो गरीब कुटुंबांचे जीवन धोक्यात आले आहे. महागाई, वाढती मजुरी आणि साहित्य खर्चामुळे अनेक कुटुंबे आधीच कर्जबाजारी आहेत. अनेक घरकुल कामे अर्धवट अवस्थेत असून काही लोक आजही असुरक्षित घरांमध्ये राहत आहेत.
नगरपरिषद प्रशासनाविरोधात दलित पँथर संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले असून सर्व प्रलंबित हप्ते तातडीने जमा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, प्रशासनाने वेळेत काम केले नाही, तर 26 जानेवारी 2026 रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर शोले स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनामुळे उद्भवणार्‍या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या वेळी प्रेम कांबळे, आकाश वाघमारे, विशाल जाधव, अरविंद ईनकर इत्यादी उपस्थित होते.

COMMENTS