माहूर । प्रतिनीधी माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी वाहन पार्किंगच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घ
माहूर । प्रतिनीधी
माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी वाहन पार्किंगच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन भाविकांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुंदा (ता. किनवट) येथील भाविक उल्हास थावू जाधव व प्रकाश टारपें हे दिनांक 10 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आपल्या कार क्रमांक चक 26 उए 6128 (टाटा नेक्सॉन) ने रेणुका गडावर दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या पायथ्याशी वाहन पार्किंग करत असताना पार्किंगच्या कारणावरून त्यांचा काही तरुणांशी वाद झाला. हा वाद चिघळून आदित्य विध्वंस, पार्थ विध्वंस, अजय उर्फ मोघ्या विध्वंस व विशाल आराध्ये यांनी भाविकांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी उल्हास थावू जाधव (वय 55, रा. गोकुंदा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास माहूर पोलीस करीत आहेत.

COMMENTS