समाजमाध्यमांनीच केली कंगणाची बोलती बंद

Homeसंपादकीयदखल

समाजमाध्यमांनीच केली कंगणाची बोलती बंद

समाजमाध्यमं व्यक्त होण्याचं साधन असलं, तरी या साधनांचा दुरुपयोग केला, तर ही माध्यमं गप्प बसत नाही. त्यांच्याकडं कारवाई करण्याचं हत्यार असतं.

नव्या लोकसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही !
नागपूरमध्ये शिवसेनेला धोबीपछाड, तर नगरमध्ये काँग्रेसला
राज्यातील २८ महापालिका लोकशाहीविनाच !

समाजमाध्यमं व्यक्त होण्याचं साधन असलं, तरी या साधनांचा दुरुपयोग केला, तर ही माध्यमं गप्प बसत नाही. त्यांच्याकडं कारवाई करण्याचं हत्यार असतं. समाज माध्यमांनी कारवाईचं हत्यार उगारलं, तर ज्यांना ही माध्यमं वापरण्याची सवय आहे, त्यांचं काय होत असेल, याचा विचारच न केलेला बरा. अन्य कोणत्याही कारवाईपेक्षा ही कारवाई जखमेवरचं मीठ असतं. 

    समाज माध्यमं ही दुधारी अस्त्रं आहेत. त्यांच्यावर व्यक्त होण्याचं काहींना व्यसन लागतं. या माध्यमांवर व्यक्त होण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं, तरी त्याचा गैरफायदा घेता कामा नये. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळं इतरांचं जीणं कठीण होईल, असंही व्यक्त होणं चुकीचं आहे. काही अंधभक्तांना काहींचं समर्थन करता करता इतरांवर खालच्या पातळीवर आपण टीका करीत आहोत, याचं भान भान राहत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो. आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील, याचं भान ठेवलं जात नाही. गांभीर्याचा अभाव असला, तरी शहाणपणही गहाण ठेवलं जातं. इतरांवर टीका करायची आणि इतरांनी टीका केली, तर मग मात्र आकांडतांडव करायचं, असा काहींचा स्वभाव असतो. कंगणा राणावत ही त्यापैकी एक. भाजपच्या कच्छपि लागताना ती शिवसेनेवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करते. स्वतः नियमभंग करताना कारवाई केली, की मग गळा काढायचा, ही तिची वृत्ती. कंगणा राणावत ’सोशल मीडिया’वर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. ती प्रत्येक विषयावर आपलं मत व्यक्त करण्यासाठी मागंपुढं पाहत नाही, त्यामुळं अनेकदा ती वादातही अडकते. ट्वीटरवर वादग्रस्त मजकूर टाकल्यामुळं तिचं खातं बंद करण्यात आलं. त्यामुळं तिनं इन्स्टाग्रामवर व्यक्त व्हायला सुरुवात केली. तसा तिला अधिकार आहे; परंतु हे करताना तारतम्य बाळगलं पाहिजे. आता ती इन्स्टाग्रामशी पंगा घेणार असल्याचं चित्र आहे. आता काही दिवसांपूर्वी कंगणाला कोरोना झाला. जगात कोरोनानं हाहाकार माजविला आहे. भारतात दररोज चार लाख बाधित आढळत आहेत. दररोज सरासरी चार हजार जणांचा मृत्यू होत आहे. बेड, ऑक्सिजन, औषधं, रुग्णवाहिका, प्राणवायू मिळत नसल्यानं लोकांना मृत्यूपंथाला जावं लागत आहे. कोरोना हा खर्चिक आजार असून त्यासाठी अनेकांना घरंदारं, संपती विकावी लागली. काही महिलांनी तर मंगळसूत्र विकलं. अशा पार्श्‍वभूमीवर कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करायची असताना कंगणा मात्र कोरोनाला साधा ताप समजत असेल, तर तिच्यामुळं नागरिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. याबद्दलची माहिती तिनं इन्स्टाग्रामवर दिली होती. त्यात तिनं कोरोनाला एक सर्वसाधारण फ्लू असं म्हटलं होतं. तिची ही पोस्ट वादग्रस्त झाली. अवैज्ञानिक विधानं केल्यामुळे इन्स्टाग्रामने तिची पोस्ट हटविली आहे. ’’मी कोरोनाला संपवणार आहे. मी ट्विटरवर अतिरेकी आणि कम्युनिस्टांची सहानुभूती ऐकली होती; मात्र कोरोना फॅन क्लब मस्तच मला इन्स्टाग्रामवर येऊन दोन दिवस झाले आहेत, असं दिसतं, की मी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ इथं टिकू शकणार नाही,’’ असं तिनं म्हटलं आहे.

    कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळं सध्या जगभरात पुन्हा एकदा हाहाकार माजला आहे. देशात सतत वाढत असलेल्या कोरोना केसेस दरम्यान आता बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणजेच अभिनेत्री कंगणादेखील कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. कंगणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. ही माहिती तिनं स्वतः ’सोशल मीडिया’च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. हे कळताच मी स्वत:ला विलगीकरण केलं आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, हे मला काहीच माहिती नव्हतं. आता मला माहीत आहे की, मी यातून लवकरच पूर्णपणे बरी होईन.’असं तिनं म्हटलं आहे. कंगणा आणि वाद हे जणू समीकरण झालं आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार स्थापन झाल्यापासून कंगना बिथरली आहे. भाजपपेक्षा तिलाच जास्त वाईट वाटलं. त्यामुळं तृणमूल काँग्रेसविरोधात ती विविध प्रकारचे ट्वीट करत होती. भाजपला पाठिंबा देत कंगणानं उघडपणे तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला होता. गँगरेपचा आरोप करत कंगणानं तृणमूल काँग्रेसविरोधात ट्वीट केलं होतं. त्यानंतर ट्विटरनं तिचं खातं निलंबित केलं होतं. कंगणाचं खातं आता कायमचं निलंबित करण्यात आलं आहे. कंगणा ट्विटरवर अनेक आक्षेपार्ह ट्वीट करत होती. पश्‍चिम बंगालमध्ये पार पडलेल्या मतदानात ममता यांचा विजय झाल्यानंतर कंगणानं अनेक आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. अनेक युझर्सनी तिच्या अकाउंट विरुद्ध कारवाई करण्याची मागणीही केली होती. त्यानंतर ट्विटरकडून कंगणाचं खातं निलंबित करण्यात आलं आहे. नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये कंगणा ममता यांना ताडका राक्षसी म्हणाली होती. यापूर्वी आणखी एक ट्वीट करत कंगणानं ममता यांची तुलना रावणाशी केली होती. बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांसाठी कंगणानं तृणमूल काँग्रेस पक्षाचे सदस्य जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे हा हिंसाचार थांबवण्यासाठी तिनं पंतप्रधान मोदी यांना 2000 सालचं उग्र रूप दाखवण्याची विनंती केली होती. त्यावरून युझर्सनी याचा संबंध 2000 साली झालेल्या गुजरात दंग्यांशी जोडत कंगणा हिंसाचारासाठी अनुकूल वातावरण तयार करत असल्याचं म्हटलं. या सर्व आक्षेपार्ह ट्वीटमुळं कंगणाचं खातं निलंबित करण्यात आलं आहे. पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या आणि राज्यात तिसर्‍यांदा ’ममताराज’ येणार असल्याचं निश्‍चित झालं. त्याचा जसा झटका पंतप्रधानांपासून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत मोठी फौज पश्‍चिम बंगालमध्ये उतरवूनदेखील पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भाजपला बसला, तसाच तो सिनेअभिनेत्री कंगणाला बसला! 

    पश्‍चिम बंगालच्या निवडणुकांचा कंगणाशी काय संबंध? ट्विटरच्या लेखी कंगनाच्या ‘वादग्रस्त ट्वीट्स’चा घडा भरला आणि ट्विटरनं कंगणाचं तोंड बंद करून टाकलं. अकाउंट नेमकं कोणत्या परिस्थितीत सस्पेंड होतं? एकदा सस्पेंड झालेले अकाउंट पुन्हा कधीच सुरू होऊ शकत नाही का? ट्विटरच्या नियमावलीनुसार एखादा ट्विटर वापरकर्ता त्याच्या अकाउंटवरून वारंवार आक्षेपार्ह, द्वेष निर्माण करणारे, अश्‍लीलता पसरवणारे, कॉपीराईट नियमांचं उल्लंघन करणारं किंवा या कोणत्याही संदर्भात ट्विटरच्या नियमावलीचं उल्लंघन करणार्‍या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरकडून कारवाई केली जाते. कंगणाचं ट्विटर अकाउंट जसं सस्पेंड करण्यात आलं आहे, त्याचप्रकारे नियमांचं उल्लंघन करणार्‍या अकाउंट्सवर कारवाईचे अनेक प्रकार ट्विटरकडं आहेत. नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर ट्विटर वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करू शकते. एखादं ट्वीट आक्षेपार्ह असेल, तर त्या ट्विटला वादग्रस्त किंवा मिसलिडिंग असं लेबल लावलं जातं. विशिष्ट प्रदेशात किंवा देशात हे ट्वीट युजर्सला दाखवलं जात नाही. ट्वीट अगदीच गंभीर असेल, तर युजरला ते काढून टाकावं लागतं. त्यासंदर्भात ट्विटरकडून युजरला मेल करून सांगितलं जातं. जोपर्यंत हे ट्वीट युजर काढत नाही, तोपर्यंत ते इतर युजर्ससाठी हाईड म्हणजेच लपवलं जातं.

    काही ट्विट्स हे नियमांचं उल्लंघन करत असूनही ट्विटरकडून अपवाद म्हणून कायम ठेवले जाऊ शकतात; पण असे टी्वट्स इतरांना दाखवण्याआधी त्यात काय आक्षेपार्ह आहे हे सांगितलं जातं. युजरनं तरी इच्छा दर्शवली, तर ते ट्वीट युजरला दाखवलं जातं. एखाद्या युजरनं केलेलं नियमांचं उल्लंघन अत्यंत गंभीर आणि वारंवार स्वरूपाचं असेल, तर ते खातं कायमस्वरूपी बंद केलं जातं. कंगणाच्या अकाउंटवर हीच कारवाई केली आहे! याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट देखील ट्विटरकडून सस्पेंड करण्यात आलं आहे.

COMMENTS