Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद : आनंद भंडारी

अहिल्यानगर : दिव्यांग कर्मचारी शारीरिक अडचणींवर मात करून आपापल्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करीत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत चांगले काम कसे करावे

चोपडा येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून तीन लाखाचे चांदीचे दागिने चोरीला 
वाढवण बंदरामुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल : मुख्यमंत्री फडणवीस
योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया : मुख्यमंत्री फडणवीस
Displaying WhatsApp Image 2025-12-03 at 17.21.18_e54082ef.jpg


अहिल्यानगर : दिव्यांग कर्मचारी शारीरिक अडचणींवर मात करून आपापल्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करीत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत चांगले काम कसे करावे, हे त्यांच्याकडून शिकावे. दिव्यांगांना सहानुभूतीची नाही तर संधीची आवश्यकता आहे. धडधाकट व्यक्ती पेक्षा दिव्यांग चांगलं काम करीत आहेत. बेरोजगार  दिव्यांगांसाठी राज्य केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत.त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण सर्वांनी काम करावं, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब यांनी केले. ते जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या दिव्यांग गुणवंत पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.या कार्यक्रमाला मुख्य वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकारी योगेश पैठणकर, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दशरथ दिघे, ॲड. सुभाष भोर  माजी सभापती रामदास भोर,  शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, संजय धामणे, संतोष दुसुंगे, सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे, अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना भंडारी साहेब म्हणाले की, आपले प्रश्न हे आमचे प्रश्न आहेत, दिव्यांगांची वारंवार तपासणी होणार नाही. यासाठी तालुकास्तरीय कमिटी स्थापन करून दिव्यांगांची तपासणी केली आहे. लाक्षणिक दिव्यांगांची पुन्हा पुन्हा तपासणी होणार नाही, असे आश्वासित केले.
 प्रास्ताविकात श्री साहेबराव अनाप यांनी दिव्यांगांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले, खऱ्या दिव्यांगांची वारंवार तपासणीतून सुटका व्हावी,दिव्यांगाना साधने उपकरणे उपलब्ध व्हावीत, दिव्यांग शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार देण्यात यावा आदी मागण्या मांडल्या.
यावेळी शिक्षणाधिकारी पाटील भास्कर पाटील साहेबांनी दिव्यांगांना भावनिकतेची गरज नसून त्यांना मुख्य प्रवाहात संधी देण्याची गरज आहे.त्यांच्यात सर्वसमावेशक नेतृत्व गुण असतात. दिव्यांग हे इतरांपेक्षा अधिक चांगलं काम करतात. दिव्यांगांना योग्य दिशा दिली तर त्यांच्या आयुष्यात दशा येणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड काढण्याबाबत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, योगेश पैठणकर, ॲड. सुभाष भोर, रामदास भोर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष सरवदे यांनी दिव्यांगांच्या पाठीमागे संघटना भक्कम उभी असून भविष्यात दिव्यांगाचे सर्व प्रश्न सोडवण्याचे व न्याय देण्याचे आश्वासित केले.
यावेळी वैशाली साहेबराव शेळके, नागापूर, ज्योती एकनाथ जाधव, श्रीरामपूर, रोहिणी भगवानराव शिंदे नेवासा, संजय अंबादास ठोकळ कर्जत, विठ्ठल दगडू बांडे मान्हेरे अकोले, जिजाबाई गणपत बनकर नांदूर दैत्य पाथर्डी, अमोल वसंतराव कडू कोपरगाव नगरपालिका 5, मंगल वसंत वामन ,जवळके कोपरगाव, हिराबाई पांडुरंग लटांबळे आळकुटी, मेहबूब शेख शेवगाव,एकनाथ साबळे पोखरी हवेली संगमनेर, रुपेश वाणी धामणगाव जामखेड, अशोक निवृत्ती दांगडे मोरेवाडी श्रीगोंदा, अलका बाळासाहेब शिंदे विशेष शिक्षक शेंडी, ज्योती बाळासाहेब तवले महिला बालकल्याण पारनेर, संदीप जगन्नाथ आदमाने कलाशिक्षक माध्यमिक विभाग, चांद कादर शेख ,बाळू चेमटे परिचर आरोग्य विभाग आदी कर्मचाऱ्यांना  दिव्यांग गुणवंत पुरस्काराने सन्मानित केले.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष राजू आव्हाड, पोपटराव धामणे कोषाध्यक्ष राजेंद्र औटी , श्रीकांत दळवी, बन्सी गुंड, राजेंद्र ठूबे, साहेबराव मले,किरण माने, शिवाजी आव्हाड, आबासाहेब बिडगर, बाळासाहेब चव्हाण, खंडागळे सर,गजानन मुंडलिक, शिवाजी आव्हाड, भाऊराव नागरे, बळीराम जाधव, नारायण लहाने,खंडू बाचकर, रामकिसन डमाळे, सुखदेव ढवळे,विजय अंधारे, मिठू शिंदे, सचिन रनाते, अजय लगड आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS