Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदीच्या पूजेच्या भांड्यांची चोरी उघडकीस; दोघांना अटक, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत

पाटण / प्रतिनिधी : मौजे दिवशी खुर्द (धारेश्‍वर), ता. पाटण येथे मठामधील चांदीच्या पूजेच्या भांड्यांची आणि रोख रकमेची चोरी करणार्‍या दोघा चोरट्यांना पा

सातारा जिल्हा प्रशासनातर्फे महाबळेश्‍वर येथे राज्यपालांचे स्वागत
सरकार विरोधी पक्षाला विश्‍वासात घेत नाही : आ. जयंत पाटील
साहेब टाळा कधी उघडणार …?

पाटण / प्रतिनिधी : मौजे दिवशी खुर्द (धारेश्‍वर), ता. पाटण येथे मठामधील चांदीच्या पूजेच्या भांड्यांची आणि रोख रकमेची चोरी करणार्‍या दोघा चोरट्यांना पाटण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली. चोरीस गेलेला अंदाजे 1,99,000 किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
ही चोरीची घटना 20 ते 22 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडली. मठाच्या पाठीमागील सिमेंटच्या दरवाज्याची कडी काढून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून चांदीची पूजेची भांडी तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. फिर्यादीच्या जबाबावरून पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिसरात तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारांच्या माहितीसोबत तांत्रिक तपासाची मदत घेत, पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला असता दोन आरोपींचा समावेश उघडकीस आला. ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या चोरीतील अटक केलेल्या संशयितांची नावे : शिवप्रसाद प्रविण जंगम (वय 21, रा. भिकवडी खुर्द, ता. कडेगाव, जि. सांगली) व गणेश सोमनाथ जंगम (वय 21, रा. भिकवडी खुर्द, ता. कडेगाव, जि. सांगली) अशी आहेत.

COMMENTS