Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाडे येथील शिवतीर्थावर 104 फुटी भगव्या ध्वजाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे हस्ते अनावरण

पाटण / प्रतिनिधी : माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवभक्ताच्या वाढदिवसा दिवशीच पाटण तालुक्यातील शिवतीर्थासमोर केवळ आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्वात उंच

81 व्या औंध संगीत महोत्सवास दिमाखात प्रारंभ
नायब तहसीलदारासह दोघांवर लाचलुचपतप्रकरणी कारवाई
शासकिय आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती बंधनकारक

पाटण / प्रतिनिधी : माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवभक्ताच्या वाढदिवसा दिवशीच पाटण तालुक्यातील शिवतीर्थासमोर केवळ आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्वात उंच असलेला भव्य भगवा ध्वज उभारला हे शिवभक्त म्हणून मला सार्थ अभिमान असल्याची भावना राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.
ते पाटण तालुक्यातील नाडे येथील शिवतीर्थावर उभारलेल्या 104 फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण करताना बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, इंद्रजित निंबाळकर सरकार, जयराज देसाई, आदित्यराज देसाई, विजय पवार, बबनराव भिसे, सरपंच सुनिता नलवडे, उपसरपंच राजेंद्र पवार, विष्णू पवार, सुरेश पानस्कर, बशीर खोंदू, विजय जंबुरे, प्रविण पाटील, बाळासो पाटणकर, सयाजी माथणे, अभिजित पाटील, बाजीराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, उपअभियंता गिरीश सावंत, संजय शिंदे, किरण दशवंत, वैभव देशमुख, गणेश भिसे, नवनाथ पाळेकर, सुनील माथणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी करणारे आणि राज्याला नवी दिशा देणारे तत्कालीन गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी समुद्रमार्गे येणार्‍या परदेशी नागरिक अथवा पर्यटकांनी भारतात पाऊल ठेवताना छत्रपती शिवरायांच्या पुढे नतमस्तक व्हावे या उद्देशाने मुंबई येथील गेट वे ऑफ येथे महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्‍वारूढ पुतळा उभारला. अगदी त्याच अश्‍वारूढ पुतळ्याची अगदी हुबेहूब पहिली प्रतिकृती पाटण तालुक्यात ही उभी करायची असा संकल्प लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या वाढदिनी केला आणि केवळ एक वर्षाच्या आत आपणाला नाडे येथे माझ्या पाटण मतदार संघाच्या प्रवेशद्वारावर महाराजांचा हा अश्‍वारूढ पुतळा उभारण्याची संधी मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्‍वारुढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा केवळ अश्‍वारूढ पुतळा नव्हे तर खर्‍या अर्थाने पाटण मतदार संघातील पहिले शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ उभारण्याचे भाग्य मला मिळाले. यावेळी धन्यवाद देऊन मंत्री शंभूराज देसाई यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला नाडे ग्रामपंचायत तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आठ दिवसांत अनावरण हा इतिहास
पाटण तालुक्यातील शिवतीर्थ परिसरात भव्य दिव्य भगवा ध्वज असावा अशी संकल्पना आपण आठ दिवसांपूर्वीच मांडली आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवतीर्थ परिसरात जिल्ह्यातील सर्वात उंच असणारा तब्बल 104 फुटी असा भव्य भगवा ध्वज पूर्णत्वास आला. त्याचे अनावरण हा खर्‍या अर्थाने एक इतिहासच झाल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

COMMENTS