Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“२६० बालकलाकारांचा जल्लोष, लोककला महोत्सवात जिंकली ३८ हजारांची रोख पारितोषिके”

अहिल्यानगर : बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित आणि अहिल्यानगर शाखा संचालित  "जल्लोष लोककलेचा" महोत्सव नुकताच रेणावीकर विद्यालयात उत्साहात संपन्न झाला

स्कूल  व्हॅन उलटून सहा विद्यार्थी जखमी
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन : संधान
अंभोरेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू -आ. खताळ
Displaying Balrangbhumi Photo.jpeg

अहिल्यानगर : बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित आणि अहिल्यानगर शाखा संचालित  “जल्लोष लोककलेचा” महोत्सव नुकताच रेणावीकर विद्यालयात उत्साहात संपन्न झाला.या महोत्सवात लोककलेशी निगडित समूह गीत गायन,एकल गीत गायन, समूह नृत्य व एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली ज्यात जिल्ह्यातून २६१ बाल कलावंतांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत प्रोत्साहनात्मक ३८ हजार रुपयांची रोख पारितोषिके सुद्धा पटकावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध रंगकर्मी नाना भाऊ मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायक पवन नाईक सर तसेच बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे श्री. सतीश लोटके,श्री. अनंत जोशी समारोप प्रसंगी उपस्थित होते.

रंगकर्मी नाना भाऊ मोरे यांनी बालरंगभूमी परिषदेतर्फे दुर्लक्षित होत चाललेल्या किंबहुना लोप पावत चाललेल्या लोककलांविषयी, लोककलेतील तज्ञ मार्गदर्शक यांनी लोककलांची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न नक्कीच अभिनंदनीय असल्याचे म्हंटले तर “जल्लोष लोककलेचा” हा असा महोत्सव आहे जो पूर्णपणे लोककलेशी समर्पित व बालरंगभूमीशी घट्ट नाळ जोडलेला असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत पावन नाईक यांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. लोककलांचा प्रगल्भ वारसा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी, यासाठी बालरंगभूमी परिषदेने स्वतःची एक स्वतंत्र भूमिका स्वीकारली आहे. केवळ महोत्सवी किंवा मनोरंजनात्मक असे स्वरुप न ठेवता ही लोकचळवळ व्हावी अशी इच्छा परिषदेचे अध्यक्ष प्रसाद भणगे यांनी व्यक्त केली.या सर्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसाद सुवर्णपाठकी, संकेत सुवर्णपाठकी, लकी छजलानी,अमृता बेडेकर, अनुजा कुलकर्णी, तेजश्री मैंड व शीतल परदेशी यांनी काम पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली दरेकर व सुजाता पायमोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेश देशमुख यांनी मानले. यावेळी स्पर्धा प्रमुख म्हणून सागर अलचेट्टी यांनी महत्वाची भूमिका बजावली  तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहिल्यानगरच्या संपूर्ण कार्यकारिणीने परिश्रम घेतले.

स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे : –
१) समूहनृत्य स्पर्धा : सर्वोत्कृष्ट- अमृतवाहिनी इंट. स्कूल संगमनेर, उत्कृष्ट – नृत्यदर्पण अकादमी, उत्तम –  अपोस्ट्रोफी डान्स अकादमी.  
२) एकलनृत्य स्पर्धा : सर्वोत्कृष्ट- त्रिशा कदम, उत्कृष्ट – टीना वाघ,उत्तम –  काव्या काथोरे , प्रशंसनीय –
वेदिका कुलकर्णी व अरित्रिका गायकवाड.
३) समूह गायन स्पर्धा : सर्वोत्कृष्ट- अमृतवाहिनी इंट.स्कूल, संगमनेर,उत्कृष्ट – हार्मनी  इंट.स्कूल.  
४) एकल वाद्य वादन : सर्वोत्कृष्ट- ओंकार वाघमारे, उत्कृष्ट – क्षितिज मुसळे, उत्तम – सात्विक शिंदे.  
५) एकल गायन : सर्वोत्कृष्ट- साई कोष्टी,उत्कृष्ट – सिद्धी वाघमारे, अनुष्का साठे, उत्तम – सोहम फटांगरे, श्राव्या सहाणे , प्रशंसनीय – रिद्धी वाघमारे  व अदिती आढाव.उल्लेखनीय – ध्वज मुनोत.  
तसेच ह्या महोत्सवानंतर दिव्यांग मुलांसाठी ‘यहा के हम सिकंदर” हा राज्यस्तरीय महोत्सव घेण्यात येणार असल्याची माहिती बालरंगभूमी परिषदेच्या वतीने देण्यात आली.

COMMENTS