अहिल्यानगर : सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा (२
अहिल्यानगर : सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा (२०२५-२६) दि. १२ नोव्हें. पासून अहिल्यानगर येथील माउली सभागृह, सावेडी येथे सुरू होत आहे. प्राथमिक फेरीतील या स्पर्धेत दि. १२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी ८ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
या स्पर्धेत १२ नोव्हें. रोजी अहमदनगर फिल्म कंपनीचे ‘मॉडर्न फॅमिली’, १४ नोव्हें. रोजी होप फाऊंडेशनचे ‘डिंक’, १५ नोव्हें. रोजी रंगमुद्रा युवा प्रतिष्ठानचे ‘नट नावाचे नाटक’, १६ नोव्हें. रोजी अजिंक्य कला क्रीडा मंडळाचे ‘लंगर’, १७ नोव्हें. रोजी नाटकवाले सेवाभावी संस्था, संगमनेरचे ‘निर्वाण जंक्शन’, १८ नोव्हें. रोजी नाट्य आराधना संस्थेचे ‘ द ब्लॅकड इक्वेशन’, १९ नोव्हें. रोजी नाट्य मल्हार प्रतिष्ठानचे ‘अय ..’, २० नोव्हें. रोजी न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगावचे ‘आला रे राजा’, २१ नोव्हें. रोजी प्रवरा थिएटर्स व एफ. के. क्रीएटीव्ह क्रिएशन्स, शेवगावचे ‘ उत्खनन’, २२ नोव्हें. रोजी राजगड प्रतिष्ठानचे ‘पिसाळा’, २३ नोव्हें. रोजी केक फाऊंडेशनचे ‘माझं घर’, २४ नोव्हें. रोजी संकल्पना फाउंडेशन, कोपरगावचे ‘स्वप्नवाट’, २५ नोव्हें. रोजी रंगोदय प्रतिष्ठानचे ‘फार्म हाऊस’, २६ नोव्हें. रोजी समर्थ युवा प्रतिष्ठान, घोडेगावचे ‘गेला बाजार’, २७ नोव्हें. रोजी कल्पद्रुम फाऊंडेशनचे ‘लास्ट स्टॉप’, २८ नोव्हें. रोजी सप्तरंग थिएटर्सचे ‘लुई दागेरी ते पिकासो’, २९ नोव्हें. रोजी शांती फाऊंडेशन, संगमनेरचे … ‘खतरे मे है’ ३० नोव्हें. रोजी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ, पाथर्डीचे ‘नाना जरा थांबा ना’, १ डिसें. रोजी तुळजा फाऊंडेशन, श्रीरामपूरचे ‘दानव’, २ डिसें. रोजी वात्सल्य प्रतिष्ठानचे ‘ हॅश टॅग’, ३ डिसें. रोजी रंगकर्मी संगमनेर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संगमेनरचे ‘पेन’, ४ डिसें. रोजी विश्वकर्मा क्रीडा सांस्कृतिक युवक कल्याण मंडळाचे ‘फक्त लढ म्हणा’ आणि ५ डिसें. रोजी युवा फिनिक्स फाऊंडेशनचे ‘जन्मवारी’ ही नाटके सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री.विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण २३ संघांचा सहभाग असून अहिल्यानगर जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांसाठी तिकीट दर : र १५/- व १०/- हे नाममात्र शुल्क असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

COMMENTS