Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड बसस्थानक कधी चिखलात तर कधी फुफाट्यात 

जामखेड : गेल्या पाच महिन्यांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे जामखेड बस स्थानक चिखलमय झाले आहे.पाणी बाहेर जाण्यासाठी जागाच नाही. सतत पाऊस असल्

रेल्वे अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू ; मुब्र्यांजवळ रेल्वेतून पडल्याने घटना
व्हीव्हीपॅट विना निवडणूक घेण्याचा कोडगेपणा, लोकशाहीला खड्ड्यात घेऊन जाणारा !
संविधान विरोधी शक्तींचा देशाच्या अखंडतेला धोका : डॉ. अशोक ढवळे
Displaying 1761828072536.jpg

जामखेड : गेल्या पाच महिन्यांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे जामखेड बस स्थानक चिखलमय झाले आहे.पाणी बाहेर जाण्यासाठी जागाच नाही. सतत पाऊस असल्याने चिखल वाळत नाही. बसस्थानकात बस उभ्या राहण्यास पूरेशी जागा नाही.

बस, प्रवाशी अक्षरक्ष: चिखलात पाण्यात उभा राहतात. बस स्थानक इमारतीचे काम चालू असल्याने अपूरया जागेत कसे बसे प्रवाशी उभे राहतात. बस ड्रायव्हरला नोंदणी करण्यासाठी खाली उतरण्याची इच्छा होत नाही. पाणी चिखलात उतरता प्रवाशांना बसमध्ये उतार चढ करावी लागते.   प्रवाशांच्या अंगावर चिखल पाणी उडते. मुकाटपणे सर्व सहन करत आहेत. मात्र एकाही पुढारयांचे या त्रासदायक परिस्थितीकडे लक्ष नाही. प्रवाशी संघटना नावालाच आहे. कोणाचेच या गंभीर बाबीकडे लक्ष नाही.  जामखेड चार जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवर आहे. त्यामूळे मोठ्या प्रमाणावर बसेसची, प्रवाशांची येजा होत आहे.

त्यातच दिवाळी सणामूळे प्रवाशांची तोबा गर्दी. या प्रवाशांना या चिखलात बसची वाट पाहण्याची नामुष्की येत आहे. महिलांना वृध्दांना लहान मुलांना बस स्थानकातील विपरित परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवाळी सणाला आपल्या माहेरी जाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी आहे.  या महिलांना या चिखलातून वाट काढत बस पकडताना मोठी कसरत करावी लागत आहे.  जामखेड बसस्थानकात सततच्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. चिखल आणि गाळ साचल्यामुळे ही त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवाशांना,अशीच परिस्थिती अजून किती दिवस राहणार. या त्रासदायक परिस्थितीला ठेकेदार आमदार सःबधित आधिकारी जवाबदार आहेत अशी नागरिकांची ओरड आहे. 

जामखेडमध्ये अत्याधुनिक पध्दतीने नवीन बस स्थानक इमारतीचे काम अत्यंत धीम्या गतीने चालू आहे. बसस्थानक कधी पूर्ण होणार? पाणी चिखल नंतर फुफाटा असे चक्री त्रास आणखी कीती दिवस सहन करावा लागणार असा प्रश्न नागरिक, व्यावसायिक, प्रवासी जेष्ठ नागरिक व महिला विचारत आहेत. सध्या बस उभे राहण्यास जागा कमी असल्याने अनेक बस बाहेर महामार्गावरच उभ्या राहतात. प्रवाशांना बस पकडण्यासाठी बसस्थानकात थांबावे की बाहेर रस्यावर थांबावे कळत नाही. 

COMMENTS