Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नव्या पिढीच्या शिक्षकांनी हा पेशा जपावा: प्रा. मकरंद खेर

अहिल्यानगर : शिक्षक होणे ही भाग्याची गोष्ट आहे. शिक्षण क्षेत्रातील नवीन पिढीने शिक्षिका पेशा व्रतस्थ भावनेने प्रामाणिकपणे जपावा असे आग्रही आवाहन

आपला दवाखान्याची वेळ गैरसोयीची
बस आणि आयशरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
नाशिक शहरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश
Displaying IMG-20250908-WA0008.jpg

अहिल्यानगर : शिक्षक होणे ही भाग्याची गोष्ट आहे. शिक्षण क्षेत्रातील नवीन पिढीने शिक्षिका पेशा व्रतस्थ भावनेने प्रामाणिकपणे जपावा असे आग्रही आवाहन राष्ट्रपती पदक प्राप्त आदर्श शिक्षक प्रा. मकरंद खेर यांनी केले.

शिक्षक दिनी ५ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगरचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व नक्षत्र परिवार (प्राणायाम) तर्फे नक्षत्र लॉन्चच्या हिरवळीवर सायंकाळी रम्य वातावरणात प्रभागातील शिक्षकांच्या कृतज्ञता सोहळ्यात प्रा. खेर बोलत होते.

प्रा. खेर पुढे म्हणाले की, शिक्षकांचे जीवन भाग्यवान असते. कर्तृत्ववान ठरलेले विद्यार्थी आई वडीलानंतर शिक्षकांची आठवण ठेवून भेटण्यासाठी येतात. शिक्षकांना वंदन करून आशीर्वाद घेतात. शिक्षकांपशी मन मोकळे करून भरभरून बोलतात तेव्हा शिक्षिकी पेशाचे सार्थक होते. यासाठी नवीन पिढीच्या शिक्षकांनी हा धंदा नसून प्रोफेशन म्हणजे पेशा असून त्याचे पावित्र्य राखले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

सुमारे २०० शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अवधूत फुलसौदर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सतीश गुगळे सर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविकात माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणजे की, सर्व शिक्षकांना आम्ही नक्षत्र परिवाराचा भाग मानतो. प्रत्येकाला नवीन ज्ञान देणारा आणि नवीन पिढी घडवण्यासाठी योगदान देणारा शिक्षकच असतो. चांगल्या समाजासाठी शिक्षकच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे योगदान देत असतात.

याप्रसंगी माजी मुख्याध्यापक अभिमन्यू चव्हाण, ध्यानधारणा अभ्यासक मेजर अविनाश ठोकळ, निवृत्त शिक्षक रामकृष्ण आव्हाड, श्रीराम खाडे, बडवे मॅडम, बाबर सर, प्रफुल्ल पवार, दत्तात्रय साबळे, सुनिता दगडे आदींनी मनोगत व्यक्त करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सर्व शिक्षक मान्यवरांनी शिक्षिकी पेशामुळे जीवनाचे सार्थक झाले अशा भावना व्यक्त केल्या. या पेशात भ्रष्टाचार, चोऱ्या नसल्याने शिक्षकांना मोक्षच मिळतो. कर्तृत्ववान विद्यार्थी जेव्हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा करिअर सफल होते अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. या अनौपचारिक सन्मान सोहळ्यात सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षकांसह सुनिता फुलसौंदर, विष्णूशेठ फुलसौदर, अनुरिता झगडे, अलका मुंदडा, उबाळे बंधू, किशोर गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी सन्मान सोहळ्याबदद्ल भगवान फुलसौंदर परिवाराचे आभार मानले.

COMMENTS