Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेश विसर्जन मिरवणुकीत विद्युत यंत्रणेपासून सावधगिरी बाळगा; महावितरणचे आवाहन

अहिल्यानगर :  गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशभक्तांनी ऊत्सव साजरा क

ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनात दर्जा, सौंदर्य, पर्यावरणाचा समतोल राखा : उपमुख्यमंत्री अजित पवार
बंदिजनांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट
‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी’ योजनेचा आज शुभारंभ

अहिल्यानगर :  गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशभक्तांनी ऊत्सव साजरा करताना सध्या सर्वत्र सातत्याने पाऊस पडत असल्याने विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने वीज वाहक साहित्याचा वापर न करता,  वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.  

 सर्वत्र पावसाचे वातावरण असल्याने मिरवणुकीदरम्यान वीजवाहिन्या, विद्युत खांब तसेच ट्रान्सफॉर्मर आदी वीज यंत्रणेजवळून जाताना   सुरक्षित अंतर राखून विशेष दक्षता घेण्याची सूचना व  आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान उंच रथ, सजावट केलेले मंडप, झेंडे वा पताका यांचा संपर्क वीजवाहिन्यांशी आल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे  गणेश मंडळांनी मिरवणुक मार्गादरम्यान वीजवाहिन्या आणि विद्युत उपकरणांपासून आवश्यक तेवढे सुरक्षित अंतर  राखणे गरजेचे आहे.  नागरिकांनी तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खालील बाबींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. मिरवणुकीत उंच फलक, झेंडे, रथ वा सजावट अशा उपकरणांचा वापर करताना विद्युत  वाहक साहित्य न वापरता विद्युत वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.

·  झेंडे, पताका यांना शक्यतो स्टीलचे रॉड वापरू नये, स्टील हे वीजवाहक असल्याने  प्राणांतिक अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे  लाकडी अथवा पीव्हीसी पाईप वापरावेत.

· विद्युत रोहित्र,  वीज तारा वा विद्युत यंत्रणेजवळ फटाके फोडू नयेत.

· कुठेही विद्युत तारा तुटलेले किंवा पडलेले दिसल्यास तत्काळ महावितरणच्या आपत्कालीन २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर  किंवा स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. 

नागरिकांची सजगता व जागरूकपणा अनेकांचे प्राण वाचवू शकतो. अपघात टाळून सुरक्षित व आनंदी वातावरणात उत्सव पार पाडणे हेच सर्वांचे ध्येय असून, नागरिकांनी आनंदाच्या उत्सवाबरोबरच सर्वांच्या सुरक्षिततेचाही विचार करून विसर्जन मिरवणुक निर्विघ्न पार पडावी.

या दरम्यान अखंडित वीज  पुरवठा करण्याकरीता महावितरण व कर्मचारी तत्पर असून आपत्कालीन परिस्थितीमुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास संयम राखून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

COMMENTS