पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; आमदार निलेश लंकेकडे रोख

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; आमदार निलेश लंकेकडे रोख

अहमदनगर : कोरोना काळात केलेल्या कामामुळे पारनेरचे आमदार हिरो बनले; मात्र महसूल प्रशासनातं त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. राजकीय दबाव असय झाल्याने

बेलापूरात सापडले गुप्तधन |माझं गाव माझी बातमी|LokNews24 |
दुषित जल शुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध
भर पावसात केले पुण्यातील नेत्यांनी मनसेच्या शाखेचे केले उदघाटन

अहमदनगर : कोरोना काळात केलेल्या कामामुळे पारनेरचे आमदार हिरो बनले; मात्र महसूल प्रशासनातं त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. राजकीय दबाव असय झाल्याने येथील महिला तहसीलदारांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांची लोकप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा देणारी आडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्यामागे. पण नंतर वाटते पोथ्यांत सांगितले आहे तसे यांना माफ करावे… माझ्यासारखी एक महिला अधिकारी विझली तर राज्यातील सर्व पुरुष अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महिला अधिकार्‍यांना घाबरून वागतील… किंवा इतर महिला अधिकारी ज्योतीसारखे फार धाडसाने वागू नये म्हणतील. साईड पोस्ट मागतील किंवा नोकरीच सोडतील… अशा हुंदके देत व्यक्त होत असलेल्या भावना शुक्रवारी राज्यात खळबळ उडवून गेल्या. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा दिलेला इशारा व तो देत असताना हुंदके देत कथन केलेला छळ ऐकून समाजमन मात्र अस्वस्थ झाले आहे. नगर जिल्ह्यातील पारनेरला तहसीलदार म्हणून ज्योती देवरे काम करतात. त्यांनी शुक्रवारी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिला आहे. वरिष्ठ महिला अधिकार्‍याची ही सुसाइड ऑडिओ नोट राज्यभर चर्चेत आहे. लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते झुंडीने धावून येतात; मदतीऐवजी वरिष्ठ मारेकरीच पोहोचवितात. लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले, असे हृदयाला बोचणारे शल्य या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी व्यक्त केल्याने प्रशासनात काम करणार्‍या महिला अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

COMMENTS