डॉ. अशोक सोनवणेअहिल्यानगर ः अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्तांना खरंतर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची नामी संधी. मात्र या महापालिकेत आलेला अपवादाने
डॉ. अशोक सोनवणे
अहिल्यानगर ः अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्तांना खरंतर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची नामी संधी. मात्र या महापालिकेत आलेला अपवादाने वगळल्यास प्रत्येक अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचाराचे कुरण समजून या जितके ओरबडता येईल तितके ओरबडण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे. महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या कारकीर्दीत देखील ओपन पीसचा मोठा घोटाळा झाला असून, हा घोटाळा तब्बल 100 कोटींच्या जवळपास असण्याची चर्चा जोमात सुरू आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, शहराचा विकास आराखडा अर्थात डीपी तयार करतांना शहरातील आणि उपनगरातील असलेले ओपन स्पेस याची महानगरपालिकेने परस्पर विल्हेवाट लावल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील शाळा, नाट्यगृह, खुले मैदान या परिसराभोवती असलेली ओपन स्पेसमध्ये बांधकाम करता येत नाही, अशावेळी या ओपन स्पेसची महानगरपालिकेने परस्पर विल्हेवाट लावून त्यातून कोट्यावधींची माया गोळा केल्याचे दिसून येत आहे.
हा घोटाळा तब्बल 100 कोटींच्या जवळपास असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळेच आयुक्त आणि नगररचना विभागाकडून शहरातील ओढ्या-नाल्यासंदर्भात चुकीची माहिती देवून जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख यांची दिशाभूल करून संबंधित अर्थपूर्ण भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. खरंतर शहराचा विकास आराखडा तयार करत असतांना महापालिकेचे असणारे ओपन स्पेसचे भूखंड याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची गरज असतांना तेच भूखंड कोट्यावधी रूपयांना विकून कोट्यावधी रूपयांचा घोटाळा करण्यात आला आहे.
त्यामुळे यासंदर्भात या ओपन स्पेसच्या संदर्भात महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी होतांना दिसून येत आहे. या सर्व भ्रष्टाचाराची सुरूवात होते शहरातील 41 ओढ्या-नाल्यापासून. सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी आणि दैनिक लोकमंंथनने सातत्याने यासंदर्भात भूमिका मांडली होती.
खरंतर 2023 मध्ये महानगरपालिकेनेच शहरात 41 ओढे-नाले असल्याचे पत्र दिले आहे. ते पत्र आमच्याजवळ असून, त्यानंतर 2025 मध्ये जून महिन्यात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महानगरपालिका तक्रारदारांने केलेले ओढे-नाले 1978 च्या डीपीमध्ये नसल्याचे सांगत आहेत.
जर महानगरपालिकेनुसार जर 1978 च्या डीपी प्लॉनमध्ये जर 41 ओढे-नाले नाहीत, तर 2023 मधे ते आले कुठून? त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी चक्क जिल्हाधिकारी महोदयांच्या डोळयांत धुळफेक करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या ओढ्या-नाल्याभोवती बांधकाम करण्यास महानगरपालिकेनेच परवानग्या दिल्या आहेत, त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग महापालिका शोधतांना दिसून येत आहे. त्यासोबतच ओपन पीसचा मोठा घोटाळा असून त्यासंदर्भात आम्ही लवकरच नगरविकास विभाग, आणि मुख्यमंत्री महोदयांकडे दाद मागणार आहोत.
चौकट——–
नगररचनाच्या स्नेहल यादव यांची कारकीर्द संशयास्पद ?
अहिल्यानगर महानगरपालिकेतील सर्वात प्रमुख विभाग म्हणजे नगररचना विभाग. या विभागाच्या प्रमुख असलेल्या श्रीमती स्नेहल यादव यांनी सर्वसामान्यांची कोणतीही कामे अर्थपूर्ण देवघेव केल्याशिवाय न करण्याचा मोठा विडाच उचलल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीव टांगणीला लागला असून, अनेक ज्येष्ठ नागरिक महानगरपालिकेचे उंबरठे झिजवतांना दिसून येत आहे.
चौकट———-
डॉ. जावळे यांच्याही कारकीर्दीची चौकशी व्हावी
तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत निलंबित करण्यात आले होते, त्यांनीही आपल्या कारकीर्दीत केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरतांना दिसून येत आहे. नियोजनबद्धरित्या केलेल्या भ्रष्टाचारामुळे महानगरपालिकेने एक वेगळाच उच्चांक स्थापित केल्याचे दिसून येत आहे.


COMMENTS