Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक!  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड : दुकानामध्ये सामान घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला गोडाऊन मध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात व तोंड दाबुन तिच्यावर अत्याचार केला.

खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
बुलेटस्वारांचा ’फटाका’ बंद; पोलिसांनी 5 लाखांच्या सायलेन्सरवर फिरवला रोलर
राज्यात १२० वसतिगृहांच्या माध्यमातून २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

जामखेड : दुकानामध्ये सामान घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला गोडाऊन मध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात व तोंड दाबुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्जत जामखेडचे आ. रोहीत पवार यांनी या घटनेबाबत सोशल मिडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला असुन आरोपीला अटक न झाल्यास प्रशासनाला परवडणार नाही असे देखील म्हंटले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील नान्नज येथे दि ३० जुन रोजी १२ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी व तीची आई दुकानात असताना त्या ठिकाणी आरोपी मनोज महादेव हुंबे वय २५ रा बोर्ले ता. जामखेड व त्याच्या सोबत त्याचा एक अल्पवयीन मित्र असे दोघेजण दुकानात आले. अल्पवयीन मुलगा हा अल्पवयीन फीर्यादी मुलगी हीच्या वर्गातीलच आहे. यानंतर सामान देण्यासाठी फीर्यादी अल्पवयीन मुलगी व आरोपी हे त्यांच्या घराजवळील गोडाऊन मध्ये आले. यावेळी पिडीत मुलाने फीर्यादी मुलीचे तोंड दाबले व दोन्ही हात पकडले तर आरोपी मनोज हुंबे याने पिडीत  मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळाहुन आरोपी पळुन गेले. यानंतर सदरचा घडलेला प्रकार पिडीत मुलीने आपल्या आईला सांगितला व त्यानंतर पिडीत मुलीच्या आईवडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली.याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मनोज महादेव हुंबे  व त्याचा एक अल्पवयीन मित्र दोघे रा. बोर्ले ता. जामखेड या दोघांनवर जामखेड पोलीस स्टेशनला पोक्सो व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मधील अल्पवयीन मुलास अहिल्यानगर येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले असुन दुसरा आरोपी मनोज हुंबे हा अद्याप फरार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.

आ. रोहीत पवार यांनी केला संताप व्यक्त

या घटनेप्रकणी आ. रोहीत पवार यांनी फेसबुक पोष्ट करित म्हंटले आहे की माझ्या मतदारसंघात एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलीसोबत झालेला अत्याचाराचा प्रकार हा अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणा असून या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. यासंदर्भात पोलिस अधीक्षक घार्गे यांच्याशी बोलणं झालं असून एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत तर दुसऱ्या आरोपीलाही तातडीने अटक करण्याबाबत पोलिस प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण अटक झाली नाही तर ते प्रशासनाला परवडणार नाही. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत? गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला असून सरकारने याकडं कठोरपणे लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरुन महाराष्ट्रात एकाही भगिनीकडं वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीही हिंमत होता कामा नये!

COMMENTS