Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ब्लॉसमिंग ऑलमंड’ या मराठी चित्रपटाची ११ व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

अहिल्यानगर : मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. ‘ब्लॉसमिंग ऑलमंड’ या मराठी चित्रपटाची निवड दक्षिण कोरियात होणाऱ्या ११ व्य

लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात
मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार : मंत्री उदय सामंत
Displaying MIR_3033.jpeg

अहिल्यानगर : मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. ‘ब्लॉसमिंग ऑलमंड’ या मराठी चित्रपटाची निवड दक्षिण कोरियात होणाऱ्या ११ व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृतपणे करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निहाल एस. घोडके यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवादही त्यांनीच लिहिले आहेत. अनंत काळे यांनी स्क्रिप्ट सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. सिनेमॅटोग्राफीचे काम सचिन गायगोवे यांनी पार पाडले, तर संपादनाची जबाबदारी अमोल सुरुणकर यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात मनीषा मोरे, पुरुषोत्तम उपाध्ये, एन. के. गर्जे, जानवी लटके, अंजली कोंडावार, रावसाहेब अलकुटे आणि प्रणित मेढे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सहयोगी दिग्दर्शक म्हणून अमोल सुरुणकर, तर सहाय्यक म्हणून मयूर आहेर, कराळे शुभ आणि रिझवान सय्यद यांनी योगदान दिले आहे. प्रकाशयोजनेची जबाबदारी सचिन गायगोवे, दिनेश सुतार आणि रिझवान सय्यद यांनी सांभाळली आहे. तर पोशाख आणि मेकअप विभागात श्रेया गायकवाड, अपूर्वा काकडे आणि सोनिया लोटके यांचा सहभाग आहे.
ध्वनी विभागात शुभम कराळे आणि दिनेश सुतार यांनी काम पाहिले असून, कास्टिंग टीममध्ये निवृत्ती गर्जे आणि पुरुषोत्तम उपाध्याय यांचा समावेश आहे. कार्यकारी निर्माते म्हणून अमोल के. सुरुणकर आणि निहाल एस. घोडके कार्यरत आहेत.
हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा टप्पा त्यांच्या चित्रपट प्रवासातील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत आहे. मानवी नात्यांमधील भावभावनांचे पदर उलगडणाऱ्या या सिनेमाला परदेशात कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

COMMENTS