Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनद्वारे महावितरणच्या १४०० कर्मचाऱ्यांकडून विद्युत सुरक्षेचा जागर

पुणे: महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या ‘शून्य विद्युत अपघात; महावितरण अन् महाराष्ट्र’ संकल्पनेतून विद्युत सुरक्षा सप्ताहा

हिंगोलीत आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
संगमनेरमध्ये सराईतांच्या दोन टोळ्या पकडल्या ; सात आरोपींना अटक
खत विक्रेत्यांचा पत्रकार व कार्यकर्त्यावर दबाव? असोसिएशनची मग्रुरी आणि ’चोराच्या उलट्या बोंबा!’
Displaying MSEDCL Marathon (1).JPG

पुणेमहावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या ‘शून्य विद्युत अपघात; महावितरण अन् महाराष्ट्र’ संकल्पनेतून विद्युत सुरक्षा सप्ताहाला रविवारी (दि. १) प्रारंभ झाला. यात चिंचवड येथे सकाळी आयोजित ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनमध्ये पुणे परिमंडलातील तब्बल १ हजार ३६१ अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांनी सहभागी होऊन विद्युत सुरक्षेचा जागर केला. प्रत्येकी तीन व पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनमधील विजेत्यांना पदके प्रदान करून गौरविण्यात आले. 

बिजलीनगर (चिंचवड) येथील महावितरणच्या उपविभाग कार्यालय परिसरात विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यासाठी ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनचे आज सकाळी ६.३० वाजता संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही मॅरेथॉनमध्ये दीड किलोमीटर धावत सर्वांना प्रोत्साहित केले. तीन किलोमीटरमध्ये १०४३ व पाच किलोमीटरमध्ये ३१८ अशा १३६१ अधिकारी, कर्मचारी व पाल्यांनी सहभाग घेतला.

बिजलीनगर-स्पाईन चौक-वाल्हेकरवाडी-बिजलीनगर या मार्गाने मॅरेथॉन अत्यंत उत्साहात झाली. विशेष म्हणजे, १० वर्षीय शर्विन राहुल पवार व श्रेयस प्रवीण आंधळे यांनी ५ किलोमीटर अंतर पूर्ण करीत सर्वांची वाहवा मिळविली. या दोन्ही बालकांना पदके देऊन गौरविण्यात आले. त्यांच्यासह महावितरणचे आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतिक वाईकर, गुलाबसिंग वसावे व राष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले होते.

मॅरेथॉनच्या तीन किलोमीटरमध्ये गुलाबसिंग वसावे, राहुल सोनटक्के, अनिल केंगळे (पुरुष गट) तर रूतूजा मानकर, सपना जावडे, दीक्षा वाल्मिक (महिला गट) यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय स्थान पटकावले. तर पाच किलोमीटरमध्ये किरण राठोड, राहुल सपकाळे, नारायण तेंडे (पुरुष गट) व स्वाती कडू, स्पृहा शेंडगे, मयूरी कचरे (महिला गट) यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक पटकावले. या विजेत्यांसह पहिल्या दहा क्रमांकाचे विजेते ठरलेले तेजस धस, गणेश कोलते, दीपक रसाळ, प्रसाद हुडे, निखिल बोराटे, ओंकार जठार, शीतल नवले, बचप्पा वावरे, मुकेश मकेश्वर, अमित पाटील, लक्ष्मण मुंडे, विजय जाधव, प्रतिक पाटील, हितेंद्र भिरूड, कृष्णराव जाधव, रवींद्र राठोड, सहदेव डांगे, अविनाश लिंबोळे, मनीष काळे, श्याम चित्ते, अमृता निकम, सुकेशनी बेले यांना पाहुण्यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक अभियंता श्री. संतोष पंचरस यांनी केले.

मॅरेथॉनच्या आयोजनासाठी कार्यकारी अभियंते शेखर मुरकुटे, सोमनाथ मुंडे, अतुल देवकर, पराग बापट तसेच दिवाकर देशमुख, हितेंद्र भिरूड, किरण सरोदे, विश्वास भोसले, भरत वशिष्ठ, अमित जाधव, अमित शिंदे, श्रीकांत लोथे, सुरेश पवार, अनिल डोंगरे आदींनी पुढाकार घेतला.

COMMENTS