Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युपीएससीद्वारे भारतीय वनसेवा परीक्षेत तेजस्विनी खांबे देशात 47 वी

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील तेजस्विनी राजाराम खांबे हिने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात 47 वा क्रमांक पटकावत यश संपादन केले आहे. तिच्या

राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना विद्यार्थी दिनी कोमात
फलटणमध्ये पुण्याच्या व्यापार्‍याला भरदिवसा लुटले
किल्ल प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही : ना. एकनाथ शिंदे

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील तेजस्विनी राजाराम खांबे हिने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात 47 वा क्रमांक पटकावत यश संपादन केले आहे. तिच्या यशाने इस्लामपूर शहरासह तालुक्याचे नाव उंचावले आहे. तेजस्विनी यांनी आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
तेजस्विनीचे 12 वी पर्यंतचे शिक्षण इस्लामपूरमध्ये झाले. ती इस्लामपूर हायस्कुलची विद्यार्थी असून इयत्ता दहावीमध्ये 99 टक्के गुण मिळाले होते. कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या कॉलेजमध्ये बारावीमध्ये 89 टक्के गुण मिळवून तिने पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) मधून कॉम्प्युटर सायन्समधून पदवी प्राप्त केली. अवया सॉफ्टवेअर कंपनीमध्ये दोन वर्षे नोकरी करुन तिने तिने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिने दिल्ली येथे जावून तयारी सुरु करून भारतीय वनसेवा आयोगाच्या (आयएफएस) तिसर्‍या प्रयत्नात देशात 47 रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
इस्लामपूर शहरातून बाहेर जावून जिद्दीने तिने हे स्वप्न साकार केले आहे. त्यांच्या या यशामागे त्यांचे कुटुंब, शिक्षक आणि मित्रपरिवाराचा मोलाचा पाठिंबा आहे. तेजस्विनी खांबे यांची आता भारतीय वन सेवेत अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. त्या देशाच्या वनसंपदेच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. तेजस्विनी खांबे या अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.
नगरपालिकेचे माजी पाणी पुरवठा अधिकारी आर. आर. खांबे यांची मुलगी असून वाळवा तालूका इंजिनिअरस अससोसिएशनचे अध्यक्ष जयकर खांबे व विजय खांबे यांची पुतणी आहे.

COMMENTS