म्हसवड / वार्ताहर : कुकुडवाड (ता. माण) येथे 2018 साली घटस्फोटाच्या वादातून सासूचा खून करणार्या नरवणे (ता. माण) येथील आबासो बबन काटकर (वय 42) या

म्हसवड / वार्ताहर : कुकुडवाड (ता. माण) येथे 2018 साली घटस्फोटाच्या वादातून सासूचा खून करणार्या नरवणे (ता. माण) येथील आबासो बबन काटकर (वय 42) या आरोपीस वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीस भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप व 5 हजार रुपये दंड (अन्यथा 3 महिने साधी कैद), कलम 324 अन्वये 3 वर्ष सक्तमजुरी, तर कलम 323 अन्वये 6 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली.
ही घटना 2018 मध्ये कुकुडवाड येथील शिवाजीनगर भागात घडली. आरोपीने आपल्या नणंदेला घटस्फोट का देतेस, या कारणावरून तिच्या सासू रंजना हनुमंत भोसले यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली व चाकूने छाती, कपाळ आणि हातावर वार करून त्यांचा खून केला. आरोपीने वापरलेला चाकू घटनास्थळी टाकून तो फरार झाला होता. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय व भौतिक पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासामध्ये पो. हवालदार एस. एस. सानप यांचीही मोलाची मदत झाली.
सरकारी पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील अॅड. वैभव काटकर यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत आरोपीवर दोष सिध्द केला. न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली
COMMENTS