Homeताज्या बातम्यासंपादकीय

‘ऑपरेशन सिंदूर’ वर दावा करण्याचा रिलायन्सचा घृणास्पद प्रकार!

 भारतातील काश्मीर पहलगाम येथे  २६ पर्यटकांना दहशतवाद्यांनी टार्गेट करून ठार केल्यानंतर, त्याचा बदला म्हणून काल भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त

गुढीपाडव्यादरम्यान मंदिरात भक्तांसमोर पुजाऱ्याचा खून
मणिपूर हिंसाचारापुढे सरकारची हतबलता !
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार

 भारतातील काश्मीर पहलगाम येथे  २६ पर्यटकांना दहशतवाद्यांनी टार्गेट करून ठार केल्यानंतर, त्याचा बदला म्हणून काल भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर या प्रदेशातील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करणारा हल्ला केला! या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ ही संज्ञा मिळाली. ही संज्ञा सार्थ करणारी कामगिरी भारतीय हवाई दलाच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोन्ही बहादूर महिला कर्नल-कमांडरांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे याच्यावर अचूक हल्ला करीत, ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले. मात्र, देशाच्या जनतेला अभिमान आणि गर्व वाटणारी ही बाब, यावर एक खाजगी उद्योजक आपली मालमत्ता म्हणून एक प्रकारे मोहर उमटवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सरसावला आणि   ७ मे रोजी रिलायन्स इंडस्ट्रीने ‘ऑपरेशन सिंदूर’ हा त्यांचा ट्रेडमार्क करण्यासाठी अनेक सरकारी विभागांमध्ये अर्ज दाखल केले. या बाबीवर तीव्र आक्षेप नोंदवला गेला. त्यामुळे, तातडीने त्यांनी आपले हे अर्ज मागेही घेतले. देशाच्या  सैन्य दलांनी केलेली ही कारवाई, प्रत्येक नागरिकाला अभिमान देणारी असताना, त्यावर रिलायन्स सारखा खाजगी उद्योजक आपली मालमत्ता समजून त्या संज्ञेला आपला ट्रेडमार्क बनवू पाहतो? त्यामुळे अशा प्रकारच्या उद्योग संस्थेला लाज वाटायला हवी की, देशाच्या यशस्वीतेच्या आणि स्वाभिमानाच्या संकल्पनेवर दावा करताना, तुम्ही नेमका हा प्रकार का करावा, याचा जाब त्यांनी देशाला दिला पाहिजे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ‘ऑपरेशन सिंदूर’ या संज्ञेला आपला ट्रेडमार्क करण्यासाठी दिलेला अर्ज मागे घेतला आहे, जो पाकिस्तानमध्ये भारताच्या लष्करी हल्ल्यांचे सांकेतिक नाव आहे. मात्र, हा अर्ज  अनवधानाने एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने अधिकृततेशिवाय दाखल केला होता; असा बनाव रिलायन्स ने एका निवेदनात केला आहे. रिलायन्सने म्हटले आहे की “ऑपरेशन सिंदूर, हा एक वाक्प्रचार जो आता भारतीय शौर्याचे उद्बोधक प्रतीक म्हणून राष्ट्रीय चेतनेचा एक भाग आहे. ट्रेडमार्क करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या युनिट जिओ स्टुडिओने आपला ट्रेडमार्क अर्ज मागे घेतला, असेही त्यांनी जाहीर केले. जो अर्ज सादर केला होता तो अनवधानाने एका कनिष्ठ व्यक्तीने अधिकृततेशिवाय दाखल केला होता,” असे त्यात म्हटले आहे. यापूर्वी, ऑडिओ आणि व्हिडिओ सामग्रीसारख्या मनोरंजन-संबंधित सेवांसाठी ही संज्ञा वापरण्यासाठी रिलायन्सच्या एक नव्हे तर वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून चार अर्ज बुधवारी पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेड मार्क्सच्या नियंत्रकाच्या कार्यालयात दाखल करण्यात आले होते. सर्व चार अर्ज ७ मे रोजी सकाळी १०.३२ ते संध्याकाळी ६.२७ दरम्यान विविध वर्गीकरणाच्या  अंतर्गत नोंदणीसाठी दाखल केले; ज्यात शिक्षण आणि प्रशिक्षण सेवा, चित्रपट आणि मीडिया निर्मिती, थेट प्रदर्शन आणि कार्यक्रम, डिजिटल सामग्री वितरण आणि प्रकाशन आणि सांस्कृतिक आणि क्रीडा क्रियाकलाप समाविष्ट आहेत. ही श्रेणी ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रॉडक्शन हाऊस, ब्रॉडकास्टर आणि इव्हेंट कंपन्यांद्वारे वापरली जाते. जे सुचविते की ‘ऑपरेशन सिंदूर’ हे चित्रपटाचे शीर्षक, वेब सिरीज किंवा डॉक्युमेंटरी ब्रँड बनले असते. पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सच्या कंट्रोलर जनरलने दाखवल्याप्रमाणे अर्जदारांनी दावा केलेल्या अर्जाच्या व्याप्तीनुसार रिलायन्सने मनोरंजन, प्रकाशन आणि भाषा प्रशिक्षणासाठी अर्ज दाखल केला. मुकेश अंबानी चालवल्या जाणाऱ्या कंपनीने बुधवारी पेटंटसाठी पहिल्यांदा अर्ज केला होता आणि त्यानंतर आणखी तीन मुंबईचे रहिवासी, भारतीय हवाई दलाचे निवृत्त अधिकारी आणि दिल्लीस्थित वकील यांनी हे अर्ज दाखल केले होते. परंतु, शासकीय यंत्रणेने वेळीच घेतलेले आक्षेप आणि यासंदर्भात दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी आहे. जर, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही संज्ञा रिलायन्सचा ट्रेड मार्क बनली असती तर १४० कोटी जनतेचा स्वाभीमान दु:खावला गेला असता.

COMMENTS