Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्काराने सुहास भोसले सन्मानीत

कुडाळ / वार्ताहर : जावली तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र पोलीस पाटील सुहास हणमंतराव भोसले यांना राज्यपालांच्या वतीने देण्यात येणार्‍

बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग तात्पुरता जागा
मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्या. व्ही. आर. जोशी
महावितरणच्या उत्कृष्ठ उपविभाग पुरस्काराने मेढा उपविभागाचा सन्मान

कुडाळ / वार्ताहर : जावली तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र पोलीस पाटील सुहास हणमंतराव भोसले यांना राज्यपालांच्या वतीने देण्यात येणार्‍या पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 25 हजार रुपये देऊन गौरवण्यात आले. यामुळे सातारा जिल्ह्यातील तमाम पोलीस पाटलांची मान उंचावली असून संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र दिनी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात हा सोहळा झाला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडू पाटील, पोलीस उपाधीक्षक (गृह) सबनीस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुहास भोसले यांना मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार संपूर्ण पोलीस पाटील यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे गौरवोद्गार काढले.
पोलीस पाटील म्हणून सुहास भोसले यांनी संपूर्ण जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवला आहे. महसूल, पोलीस प्रशासन व सामाजिक क्षेत्रात त्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. शासन स्तरावर त्यांच्या कार्याची दखल यापूर्वीही अनेकदा घेण्यात आली आहे. तालुका व जिल्हा स्तरावर यापूर्वीही 25 पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. याबद्दल महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खर्शी तर्फ कुडाळचे ग्रामस्थ, सर्व पोलीस पाटील तसेच जावली तालुक्यातील पदाधिकारी, अधिकारी, मित्र मंडळी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आह

COMMENTS