Homeताज्या बातम्यासंपादकीय

आक्रमक कारवाई अन् खणखणीत इशारा !

भारतीय समाज हा जगातील कुठल्याही समाजापेक्षा अधिक कॉम्प्लेक्स असणारा समाज आहे या समाजामध्ये प्रत्येक गोष्ट ही विलोभनीय असते काश्मीरमधील पालकांचा अ

शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांचे उपोषण
वाढदिवस साजरा करायला आलेल्या तरुणासोबत भयानक कांड
पुण्यात ज्वेलर्सच्या दुकानात 3 कोटींचा दरोडा

भारतीय समाज हा जगातील कुठल्याही समाजापेक्षा अधिक कॉम्प्लेक्स असणारा समाज आहे या समाजामध्ये प्रत्येक गोष्ट ही विलोभनीय असते काश्मीरमधील पालकांचा अतिरेकी हल्ला या हल्ल्यामध्ये फार झालेले हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही धर्माचे असले तरी या हल्ल्यातून पर्यटकांना वाचविणारे लोक हे काश्मीरी होते, हे दुर्लक्षून चालणार नाही. दरम्यान, भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक  राजनैतिक प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानच्या भांडवली बाजारात मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आहे. कराची शेअर बाजाराचा निर्देशांक  तब्बल अडीच हजारांनी गडगडला आहे. यामुळे पाकिस्तानी गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर पाच प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. भारताकडून पहिल्यांदाच  सिंधू नदी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. या सगळ्याचे पडसाद पाकिस्तानच्या भांडवली बाजारात उमटले आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणुकदारांनी हात आखडता घेतला आहे. बुधवारी देखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानचा विकास दर म्हणजे जीडीपी वाढीचा अंदाज २.% पर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे भांडवली बाजारात विपरीत परिणाम दिसून आला. सोबतच, पाकिस्तानी रुपयाची पडझड, राजकीय अस्थिरता आणि पाकव्याप्त काश्मीरातील असुरक्षितता या सर्वांचा परिणाम गुंतवणूकदारांवर होताना दिसत आहे. भारत प्रत्येक दहशतवाद्याला, त्यांच्या सूत्रधारांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना ओळखेल, त्यांचा माग काढेल आणि त्यांना शिक्षा करेल. आम्ही त्यांचा पाठलाग पृथ्वीच्या शेवटापर्यंत करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही, असे जहाल वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे केले आहे. कठोर संदेशात ते म्हणाले, “न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण देश या संकल्पावर ठाम आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आमच्या पाठीशी आहे. या काळात आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या विविध देशांतील लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, २२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी २६ निरपराध नागरिकांची ज्या क्रूरपणे हत्या केली त्याबद्दल देशभरातील नागरिक शोक करत आहेत. देश त्यांच्या कुटुंबियांसोबत उभा आहे, असे ते म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी पाकिस्तानी नागरिकांना तातडीने व्हिसा सेवा स्थगित केली. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की सर्व पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडणे आवश्यक आहे कारण त्यांचा व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आला आहे. भारतीयांना पाकिस्तानमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देखील दिला आहे, केंद्र सरकारने दिला आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध व्हिसा २७ एप्रिल २०२५ पासून रद्द करण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिलेला वैद्यकीय व्हिसा केवळ २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध असेल,” असेही निवेदनात म्हटले आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अतिशय कठोर पावले उचलले आहेत; तर,  नागरिकांनी देशांतर्गत या संदर्भात कोणताही धर्मद्वेष आपसात ठेवणं योग्य नाही. दोन्ही देशातील राजनैतिक आघाडीवर पंतप्रधानांनी दिलेले इशारे आणि केलेली कारवाई ही दहशतवादी हल्ल्याचा निपटारा करण्यासाठी, त्या दिशेने एक आक्रमक पाऊल आहे. त्यामुळे, देशवासीयांनी यात सहकार्य करायला हवं, हीच महत्वपूर्ण बाब आहे.

COMMENTS