Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराडमध्ये परिक्षा विद्यार्थ्यांची बडदास्त पालकांची; माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार

कराड / प्रतिनिधी : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. 19 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान सीईटीच्या परीक्षेकरिता विविध जिल्ह्यातून आलेल

प्रधानमंत्री मातृत्व अभियानांतर्गत 5 हजार 643 गरोदर मातांची तपासणी
तासवडे टोल नाक्यावर 7 कोटी 53 लाखाचे सोन्या-चांदीचे दागिणे जप्त
बोगस ‘टीईटी’ केलेल्या शिक्षकांच्या नोकर्‍या जाणार

कराड / प्रतिनिधी : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. 19 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान सीईटीच्या परीक्षेकरिता विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांची बैठक व्यवस्था राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड या ठिकाणी करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाच्या कडाक्यामुळे असह्य उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक पालक परिक्षा केंद्राबाहेर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सापडेल त्या ठिकाणी सावलीचा आधार घेऊन उभे राहिलेले निदर्शनास आले. त्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी सर्व विद्यार्थी पालकांची बैठक व्यवस्था, थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथील व्यवस्थापनास दिली होती. त्यानुसार या सर्व विद्यार्थी व पालकांची बैठक व्यवस्था यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथील व्यवस्थापनाकडून या ठिकाणी करण्यात आली आहे. याबाबत विविध जिल्ह्यातून आलेल्या पालकांनी व परिक्षार्थीनी समाधान व्यक्त केले.

COMMENTS