एअर इंडिया विक्रीसाठी नव्याने निविदा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एअर इंडिया विक्रीसाठी नव्याने निविदा

केंद्र सरकारने एअर इंडियाच्या विक्रीसाठी नव्याने निविदा मागवल्या आहेत.

Yogi Adityanath : “पुराव्याशिवाय कोणालाही अटक होणार नाही” (Video)
अल्पवयीन मुलाला मिळाली होती सलमानच्या हत्येची सुपारी
सिलिंडर स्फोटामुळे हादरली डोंबिवली

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एअर इंडियाच्या विक्रीसाठी नव्याने निविदा मागवल्या आहेत. एअर इंडिया विक्रीसाठी इच्छुक संस्थांशी शेअर खरेदी करार करण्यात येणार आहे. एअर इंडियाच्या खरेदीमध्ये रस असणार्‍या कंपन्यांना व्हर्च्युअल डेटा रूमचा अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एअर इंडिया कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. त्यामुळे सरकार ही विमान कंपनी बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. 

एका अहवालानुसार, एअर इंडियाच्या खरेदीसाठी निवडलेल्या संस्थांना आर्थिक निविदा देण्यासाठी जून किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंतची मुदत दिली जाऊ शकते. त्याचबरोबर बोली बंद झाल्यानंतर, पुढील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत एअर इंडियाच्या खरेदीच्या आर्थिक प्रस्तावाचे मूल्यांकन केले जाऊ शकते. त्यामुळे एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सप्टेंबरनंतर पूर्ण होणे अपेक्षित आहे. एअर इंडियाच्या व्यावसायिक संचालक मीनाक्षी मल्लिक यांनी आपल्या नेतृत्वात एका टीमद्वारे एअर इंडिया खरेदी करण्याबाबत बोली लावली होती; पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. 

सरकार केवळ एअर इंडियाच नव्हे, तर एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे 50 टक्के भाग विक्री करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करत असल्याची माहिती आहे. एअर इंडियामधील शंभर टक्के भागभांडवल विक्री करणार असल्याचे सरकारने याआधीच स्पष्ट केले आहे. या कंपनीवर आतापर्यंत साठ हजार कोटी रुपयांचे थकित कर्ज आहे. 2007 साली एअर इंडियामध्ये इंडियन एअरलाईन्सचे विलीनीकरण झाल्यापासून ही कंपनी तोट्यात आली आहे. तेव्हापासून या विमान कंपनीला उभारी घेता आली नाही.

COMMENTS