Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिंगार अर्बन बँकेच्यावतीने युपीआय क्युआर कोड व मोबाईल बँकिंगचा शुभारंभ

   नगर :  आज प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन पद्धत सुरु झाली आहे. इंटरनेट बँकिंग खूपच सोयीस्कर आहे. यामुळे ग्राहकांना त्यांचे व्यवहार करता येतात आण

शाहू महाराजांमुळे संभाजीराजे छत्रपती यांची माघार
रेल्वेच्या 85 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी
माजी आमदार प्रदीप नाईकांच्या बाले किल्ल्यात केरामांचा सुरुंग

   नगर :  आज प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन पद्धत सुरु झाली आहे. इंटरनेट बँकिंग खूपच सोयीस्कर आहे. यामुळे ग्राहकांना त्यांचे व्यवहार करता येतात आणि त्यांचे बॅलन्स नेहमीच तपासता येतात. ग्राहक कुठेही असले तरी, ते त्यांच्या ऑनलाइन बँकांना भेट देऊ शकतात आणि त्यांचे आर्थिक व्यवहार हाताळू शकतात. त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचुन त्यांना  सुविधा लवकर मिळत असते. यासर्व गोष्टींची गरज ओळखुन भिंगार अर्बन बँकेने सुरु केलेले  युपीआय क्युआर कोड व मोबाईल बँकिंग सेवा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले.

     भिंगार अर्बन बँकेच्यावतीने महात्मा फुले यांच्या जयंतीच्या औचित्यसाधून युपीआय क्युआर कोड व मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेचे चेअरमन अनिलराव झाडगे, व्हा.चेअरमन किसनराव चौधरी, संचालक राजेंद्र पतके, कैलासराव खरपुडे, विष्णु फुलसौंदर, महेश झोडगे, माधवराव गोंधळे, रुपेश भंडारी, कैलासराव रासकर, कैलासराव दळवी, एकनाथराव जाधव, नामदेवराव लंगोटे, श्रीमती तिलोतमा करांडे, अनिता भुजबळ, आर.डी.मंत्री, राजेंद्र बोरा, मुख्यकार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन आदी उपस्थित होते.

     यावेळी बोलतांना चेअरमन अनिलराव झोडगे म्हणाले की, इंटरनेट बँकिंग कार्यक्षम, जलद आणि प्रभावी आहे. एटीएमच्या तुलनेत विविध आर्थिक व्यवहार खूप जलद केले जातात आणि अंमलात आणले जातात. शिवाय, ऑनलाइन बँका ग्राहकांना एकाच साइटवरून अनेक बँक खाती हाताळण्याची क्षमता देतात. यार्व गोष्टींचा विचार करुन ग्राहकांना जलद सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी युपीआय क्युआर कोड व मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने करण्यात आले.

     यावेळी व्हा.चेअरमन किसनराव चौधरी म्हणाले की,    ऑनलाइन बँकिंगमध्ये नेहमीच्या व्यवहारांप्रमाणेच अनेक उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत. क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात आणि बिले भरू शकतात. ग्राहकांच्या फायद्यासाठी बँक नेहमी प्रयत्न करत असते. बँकेच्या सर्व शाखा संगणीकृत असून आता ऑनलाईन सुविधेमुळे आनखी भर पडली आहे.

     प्रास्तविक मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन बँक राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितींना दिली. आभार कैलास रासकर यांनी मानले.

COMMENTS