Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी : वडेट्टीवार

मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने तनिषा भिसे या गरोदर महिलेला 10 रूपयांच्या डिपॉजिट अभावी उपचार नाकरले होते, त्यातच तिचा मृत्यू झाल्य

चुकीचे काम करणाराच माफी मागतो : मोदींच्या माफीनाम्यावर राहुल गांधींची टीका
शाहू महाराजांना विशालगडावर जाण्यापासून रोखले
सोलापुरात पोलिस उपनिरीक्षकाची हत्या

मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने तनिषा भिसे या गरोदर महिलेला 10 रूपयांच्या डिपॉजिट अभावी उपचार नाकरले होते, त्यातच तिचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा असंवेदनशीलपणा समोर आला होता. याच पार्श्‍वभूमीवर काँगे्रस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर कडवट टीका करत मंगेशकर कुटुंब माणुसकीला लागलेला कलंक आहे. त्यांनी कधी कुणाला काही दान केले आहे का? खिलारे पाटलांनी त्यांना रुग्णालयासाठी जमीन दान दिली, पण त्यांनी त्यांनाही सोडले नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

मंगेशकर कुटुंबियांनी दोन्ही मुलींचे मातृत्व स्वीकारावे ः आ. गोरखे
भाजप आमदार अमित गोरखे यांनी मंगेशकर कुटुंबीयांना मृत तनिषा सुशांत भिसे यांच्या दोन्ही मुलींचे त्या 18 वर्षांच्या होईपर्यंत मातृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे काम पूर्वीपासून चांगले आहे. पुढेही ते असेच करत राहतील. परंतु, डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याकडून चूक झाली. त्यांनी स्वतः राजीनामा दिला आहे. आमच्यासाठी त्यांचा राजीनामा महत्त्वाचा नाही. डॉक्टर घैसास असतील किंवा इतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पण मंगेशकर कुटुंबीयांनी सामाजिक भान ठेवून त्या दोन मुलींचे मातृत्व त्या 18 वर्षांच्या होईपर्यंत घेतले पाहिजे. कारण, अशा घटनांमध्ये संस्था जबाबदार असते, असे गोरखे यांनी म्हटले आहे.

अमित गोरखेंच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह :आ. जयंत पाटील
भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. गोरखे यांनी आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेतल्याचा आरोप केला आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेण्याचे कारण काय? गोरखे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? गोरखे यांना कुणी, काही आदेश दिले आहेत का? असे विविध प्रश्‍न राज्याच्या जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. पडद्यामागे काही घडत असेल की नाही याची कल्पना नाही. पण एका आईने जीव गमावला आहे याचा संवेदनशीलपणा ठेवायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS